Silk Cocoon Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : दराच्या तेजीने रेशीम कोष उत्पादकांमध्ये उत्साह

Silk Cocoon : पारंपारिक पिके सोयाबीन, तूर, कपाशी, मुग आणि उडीद यांच्या पिकाला दोन पाने किंवा चार पाने आली असतील किंवा काही ठिकाणी अजून सुद्धा पेरणी झाली नाही.

Team Agrowon

Beed News : पारंपारिक पिके सोयाबीन, तूर, कपाशी, मुग आणि उडीद यांच्या पिकाला दोन पाने किंवा चार पाने आली असतील किंवा काही ठिकाणी अजून सुद्धा पेरणी झाली नाही. मात्र रेशीम शेतकऱ्यांचे पहिले पीक मार्केटमध्ये आले. त्याला सुमारे ६१० रुपये किलोपर्यंतचा भाव मिळाला. त्यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये फार मोठा उत्साह संचार संचारला, असल्याचे मत रेशीम उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी व्यक्त केले.

डॉ. ढवळे म्हणाले, की यावर्षी ५ हजार एकरचे लक्षांक केंद्र शासनाने दिले असताना रेशीम संचालनालयाने वाढीव दुप्पट लागवड लक्षांक ठेवला आहे. रेशीम कोषाचे दरात अशीच तेजी राहिली तर निश्चितच रेशीम शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीला कीटक संगोपन गृह बांधकामांमध्ये खूप अडचणी असतात.

तेवढी अडचण जर शासनाकडून दूर झाली तर महाराष्ट्र राज्य अपरंपारिक रेशीम उद्योगांमध्ये असताना सुद्धा पारंपारिक राज्याकडे वाटचाल करेल अशी आशा आहे. मागील वर्षी बीड जिल्ह्यामध्ये १४७६ टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले. साधारणतः ५०० रुपये किलोचा दर जरी पकडला तरी ७३.४८ कोटी रुपयांचा कोश एकट्या बीड जिल्ह्यांने उत्पादित केला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये ५४०९ टन उत्पादन झाले. यामध्ये २७ टक्के वाटा हा एकट्या बीड जिल्ह्याचा आहे.यावरूनच रेशीम उद्योग बीड जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे हे दिसून येते.

सर्वात जास्त रेशीम उद्योग करणारे गाव रुई बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असून त्यापाठोपाठ राहेरी, नागापूर माळापुरी, कामखेडा, बऱ्हाणपूर, राजेवाडी, राजेगाव, पुरुषोत्तम पुरी, टकारवाडी, बेलखंडी ही गाव १०० एकरपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत, असल्याचे डॉ. ढवळे म्हणाले. केंद्रीय रेशीम मंडळाचे डॉ. विराज आणि डॉ. मुरगुड यांनी सुद्धा रेशीम कोषाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

Crop Insurance: पीक विम्यात आता बदल अशक्य; तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक: कोकाटेंची विधानपरिषदेत घोषणा

Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Onion Cultivation : खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT