Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात मृग बहर केळी लागवड वाढण्याचे संकेत

Banana Farming : खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे एक हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे एक हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत. केळीचे दर मध्यंतरी कमी झाले होते. सध्या दर टिकून आहेत. इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण दर कमी अधिक झाले. केळी पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडले. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले.

जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू होते. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या मृग बहर केळीची काढणी काही भागात सुरू आहे. या केळीला किमान ४०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. मृग बहर केळीची लागवड मे महिन्यात सुरू होते. अर्ली लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. ही लागवड पूर्ण झाली आहे.

नियमित लागवड जूनच्या मध्यापासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते.

खानदेशात गेल्या हंगामात मृग बहर केळीची लागवड सुमारे ४१ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड सुमारे ४५००० ते ४६००० हेक्टरवर होऊ शकते. या केळीसाठी शेतकरी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग करीत आहेत. ही रोपे खानदेशात विविध कंपन्यांतर्फे पुरविली जात असून, रोपांचा पुरवठा सुरळीत आहे. जागेवर ११ ते १७ रुपये प्रतिरोप, असे दर मिळत आहेत. रोपांच्या चांगल्या उगवणक्षमतेसाठी शेतकरी कीडनाशके व अन्य बाबींची आळवणी रोपांभोवती करीत आहेत. कुकुंबर मोझॅक विषाणूला प्रतिबंधात्मक कार्यवाहीदेखील केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT