Potato Production Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Production: आसाममधील बटाटा उत्पादनात वाढ

आसाममधील इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर आणि आसाम ॲग्रोबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट (APART) च्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली.

Team Agrowon

आसाममधील बटाटा (Potato) उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले. राज्यातील बटाट्याचे हेक्टरी उत्पादन ७ टनांवरून १७ टनांपर्यंत वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

आसाम सरकारच्या फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागातर्फे आयोजित बटाटा परिषदेत बोरा बोलत होते. आसाममधील इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर आणि आसाम ॲग्रोबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट (APART) च्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली. कृषी आणि पशुवैद्यक क्षेत्रात आसामला इतर राज्यांवर अवलंबून रहाण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोरा म्हणाले.

आसाम ॲग्रोबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट (APART) अंतर्गत इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरमध्ये शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने बटाटा उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात येण्यात येत असून शेती प्रक्रियेतील तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही मागर्दशन करण्यात येत आहे. लवकरच आसाम हे बटाट्याच्या प्रमाणित बियाण्यांचे केंद्र बनेल, असा विश्वास बोरा यांनी व्यक्त केला.

सध्या संपूर्ण जगाला हवामान बदलाला (Climate Change) सामोरे जावे लागत आहे. आसामलाही हवामान बदलाचा मोठा फटका बसतो आहे. हवामान बदलामुळे कृषी क्षेत्राचे होणारे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे धडे देणे हे कृषी संशोधकांसमोरील आव्हान आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत बदल करत त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत राज्यातील शेतकऱ्यांना फलोत्पादनाच्या (Horticulture) माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही बोरा त्यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT