Soybean Production Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Production : नांदेडला सोयाबीनच्या उताऱ्यात लक्षणीय घट

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : जिल्ह्यात नगदी पीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनची सध्या मळणी सुरु आहे. परंतु सोयाबीनवर बुरशीजन्य रोगासह किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यासोबतच पावसाचा खंड पडल्यामुळेही सोयाबीनच्या उताऱ्यात घट येत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही यातून निघणे अवघड झाले आहे.

जिल्ह्यात खरिपात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनला नगदी पीक म्हणून पसंती देत पेरणी केली. परंतु यंदा सोयाबीन पिकाला सुरुवातीपासून अनेक संकटाचा सामना करावा लागला. जूनमध्ये पेरणी झाली नसल्याने जुलैमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे कोवळ्या मोडांची नासाडी झाली. यातून सावरलेल्या पिकाला ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने पिकाची वाढ खुंटली. अशा संकटाचा सामना करत असताना सप्टेंबरच्या अखेरीस पिकावर चॉरकॉल रॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला.

या रोगामुळे जिल्ह्यातील सोयाबीनच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. एका रात्रीत पिक पिवळे पडून वाळू लागल्याने झाडाच्या शेंगा भरल्या नाहीत. अशा अडचणीला सामोरे गेलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात सध्या काढणी सुरु आहे.

या सोयाबीनपासून एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा उत्पादन खर्चात २० ते ३० टक्क्यांची वाढ झालेली असताना उत्पादनात लक्षणीय घट येत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही यातून भरुन निघत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.

सोयाबीन उत्पादकांचे यंदा दुहेरी नुकसान

सोयाबीनची उत्पादकता घटल्या बरोबरच यंदा बाजारात सोयाबीनचे दरही पडले आहेत. मागीलवर्षी या काळात सात हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकणारे सोयाबीन यंदा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत विकले जात आहे. दुसरीकडे सोयाबीन कापणी, मळणीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा दोन्ही बाजूने नुकसान सहन करावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT