Soybean Production : सोयाबीनचे एकरी उत्पादन निम्म्यावर

Soybean Pest Disease : सोयाबीन हे शेतकऱ्यांचे हक्काचे नगदी पीक आहे. मात्र यंदा सोयाबीन पाऊस तसेच कीड-रोगांच्या विळख्यात सापडले आहे.
soybean production
soybean production Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : सोयाबीन हे शेतकऱ्यांचे हक्काचे नगदी पीक आहे. मात्र यंदा सोयाबीन पाऊस तसेच कीड-रोगांच्या विळख्यात सापडले आहे. त्याचा परिणाम आता उत्पादनावर झाला आहे. सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून सोयाबीनचे हाती आलेले एकरी उत्पादन निम्म्यावर आहे.

सोयाबीनला यंदा पावसाचा मोठा फटका आहे. अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुराने पीक खरडून गेले. त्यानंतर अतिपावसाने पीक पिवळे पडले. यातून शेतकऱ्यांनी पिकांना वाचविले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे आक्रमण झाले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

soybean production
Soybean Production : सोयाबीनचा उतारा अर्ध्यापेक्षाही कमी

यलो मोझॅक, खोडकीड, मूळकुज यांचा सोायाबीनवर प्रादुर्भाव झाला. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचा परिणाम आता उत्पन्नावर होताना दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांना गेल्यावर्षी एकरी सरासरी दहा क्विटंलचे उत्पादन आले त्यांना यंदा केवळ एकरी पाच ते सहा क्विंटलच सोयाबीन झाले आहे.

soybean production
Soybean Productivity : उमरगा तालुक्यात सोयाबीनचा उतारा घटला

हीच स्थिती अनेक भागांत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसत आहे. दारव्हा तालुक्यात सोयाबीन उत्पादनात घटीचे प्रमाणा जास्त आहे. हाती आलेल्या उत्पन्नाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना यंदा सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली.

एकीकडे भाव पडलेले असतानाच दुसरीकडे सोयाबीन सोंगणीच्या आणि काढणीच्या दरात वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर आलेल्या वेगवेगळ्या संकटामुळे यंदा सोयाबीन लागवडीचा खर्चही निघतो की नाही, असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

सोयाबीन जेमतेम काढले. यंदा अनेक अडचणींमुळे उत्पादन ५० टक्के कमी झाले आहे. गेल्यावर्षी एकरी दहा क्विंटल उत्पन्न झाले होते. यंदा सहा क्विंटल उत्पन्न झाले. सध्याचे भाव पाहता लागलेला खर्चही निघणे कठीण दिसत आहे.
- गजानन शेळके, शेतकरी, कंझरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com