cm  Agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka Election CM Update: कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैयांच्या गळ्यात; शपथविधीची तारीखही ठरली

Karnataka CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी जाहीर केले.

Team Agrowon

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर कॉँग्रेस अंतर्गत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातं होतं. परंतु आता सिद्धरमाया यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम करण्यात आल्याची घोषणा के सी वेणुगोपाल यांनी केली आहे.

तर कर्नाटक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी जाहीर केले.

सिद्धारमया मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० मे रोजी शपथ विधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी विरोधीपक्षातील नेत्यांनाही कॉँग्रेसकडून आमंत्रण देण्यात आले आहे.

शनिवारी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यामध्ये कॉँग्रेसने १३५ जागा मिळवत भाजपला दणका दिला. कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

त्यावरून कॉँग्रेसमध्ये सिद्धारमया आणि डीके यांची प्रमुख दोन गट पडल्याचे बोलले जात होते. परंतु सिद्धारमाया यांच्या नाव अंतिम करून अशा प्रकारच्या चर्चेला कॉँग्रेसने महासचिवांनी ब्रेक लावला आहे.

कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. डी के यांच्या समर्थकांनी देखील तशी मागणी लावून धरली होती. परंतु शेवटी कॉँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सिद्धारमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Debt Trap: कर्जबाजारीपणाचा सापळा

Ativrushti Madat: अतिवृष्टी भरपाईला नियम, निकषांची पाचर

Internation Trade: भारताची कसोटी पाहणारा काळ

Rabi Crop Insurance: रब्बीतही द्या विमा संरक्षण

E Crop Survey: ई-पीक पाहणीला महिनाभर मुदतवाढ

SCROLL FOR NEXT