Shree Dattatraya Urban Multistate Co-operative Society Status Agrowon
ॲग्रो विशेष

Shri Dattatraya Urban: श्री दत्तात्रय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीला ‘मल्टिपर्पज’ दर्जा

Co-operative Society Status: श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीला केंद्र शासनाच्या सहकार विभागाने मल्टीपर्पज व अॅग्री मल्टीपर्पज दर्जा दिल्याने संस्था आता या क्षेत्रात काम करेल, असे अध्यक्ष जगदीश मुरूमकर म्हणाले.

Team Agrowon

Akola News: श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीला केंद्र शासनाच्या सहकार विभागाने मल्टीपर्पज व अॅग्री मल्टीपर्पज असा दर्जा दिल्याने संस्था आगामी काळात या क्षेत्रात काम करेल, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष जगदीश मुरूमकर यांनी केले.

बँकेला मिळालेल्या या नवीन परवान्यांची माहिती देण्यासाठी संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. श्री. मुरूमकर पुढे म्हणाले, की संस्थेने आपल्या यशस्वी कार्याचा ३१ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे.

१९९४ साली अकोला जिल्ह्यातील शिवर या लहानशा गावातून सुरू झालेली ही संस्था आज बहुराज्यस्तरीय आर्थिक संस्थेच्या रूपात विकसित झाली आहे. सुरुवातीस जिल्हा स्तरावर कार्यरत असलेली ही संस्था २०१५ पासून महाराष्ट्र व कर्नाटकांत कार्यक्षेत्र विस्तारत सहकार विभागाकडून मल्टीस्टेट दर्जाने मान्यता प्राप्त करत पुढे आली.

सध्या संस्थेच्या एकूण ११ शाखा असून अकोला, बुलडाणा आणि वाशीम येथे संस्थेचे जाळे विस्तारले आहे. संस्थेकडे सध्या १०० कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यापैकी ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आली आहे. संस्था अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांत सक्रियपणे सहभागी असून अकोला मधील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

SCROLL FOR NEXT