Amit Shah: सहकार महापरिषदेत बॅंकिंग, साखर उद्योगावर होणार मंथन

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पुण्यात १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या सहकार महापरिषदेत (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) बॅंकिंग, साखर उद्योगातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विचारमंथन होणार आहे.
Sakal Mahaconclave
Sakal MahaconclaveAgrowon
Published on
Updated on

Cooperative Conference News पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पुण्यात १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या सहकार महापरिषदेत (Cooperative Conference) (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) (Sakal Mahaconclave) बॅंकिंग, साखर उद्योगातील (Sugar Industry) विविध प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विचारमंथन होणार आहे. या महापरिषदेत राज्यभरातून बॅंकिंग आणि साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

पुण्यात आयोजित या दोनदिवसीय महापरिषदेचे उद्‍घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता होणार आहे. तर, समारोपप्रसंगी शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत.

‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ प्रस्तुत या सहकार महापरिषदेस ‘दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक’ आणि ‘एस. एस. इंजिनिअर्स’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Sakal Mahaconclave
Vacancy In Cooperative : सहकार विभागातील रिक्त पदे भरणार

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह इतर मान्यवरांना या महापरिषदेसाठी निमंत्रित केले आहे.

महापरिषदेत सहकारी बॅंकिंग आणि पतसंस्थांसंदर्भात आयोजित चर्चासत्रांमध्ये सहकार आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस उदय जोशी, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे उपस्थित राहणार आहेत.

Sakal Mahaconclave
Amit Shaha : सहकारमुळे शेती क्षेत्राला आधार मिळाला : अमित शहा

तसेच सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, पुणे पीपल्स को-आॅपरेटीव्ह बॅंकेचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, कल्याण जनता सहकारी बॅंकेचे अतुल खिरवडकर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ शिरीष देशपांडे, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे झोनल हेड सुशील जाधव, महेश नागरी मल्टिस्टेटचे संचालक मगराज राठी आदींचा सहभाग असणार आहे.

साखर उद्योगाबाबत चर्चासत्र

साखर उद्योगासंदर्भात आयोजित चर्चासत्रांमध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शिवाजीराव देशमुख, संभाजी कडू पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर संघाचे संजय खताळ, ‘विस्मा’चे अजित चौगुले यांच्यासह साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.

या महापरिषदेत राज्यातील नागरी बॅंका, पतसंस्था तसेच साखर कारखान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक :

को-ऑपरेटिव्ह बॅंकिंग महाकॉन्क्लेव्ह ः ९८८१७१८८९०, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५ साखर उद्योग महाकॉन्क्लेव्ह ः ९८५०१५१००५, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com