bharat pathankar agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmers : 'देशाला ७५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांचे स्वप्न अपूर्णच'

Maharashtra Government : सरकारने शेतकरी, कष्टकरी यांच्यावर अन्याय केला आहे तर स्वातंत्र्यापूर्वीच्या जनतेने नव्या भारताचे स्वप्न बघितले होते.

sandeep Shirguppe

Bharat Pathankar : कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथे श्रमिक मुक्ती दलाचे २८ वे अधिवेषन पार पडले. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने शेतकरी, कष्टकरी यांच्यावर अन्याय केला आहे तर स्वातंत्र्यापूर्वीच्या जनतेने नव्या भारताचे स्वप्न बघितले होते.

मात्र, ७५ वर्षे झाली तरी या जनतेचे स्वप्न पूर्णत्वाला गेले नाही. अशी खंत पाटणकर यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वीच्या जनतेने नव्या भारताचे स्वप्न बघितले होते. परंतु, ७५ वर्षे झाली तरी या जनतेचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी झगडावे लागत आहे. सर्वप्रकारच्या शोषणापासून समाज मुक्त होण्यासाठी संघर्षाचा नव्याने लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

गेले दोन दिवस राज्यातील प्रतिनिधींच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन विविध ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी राज्यातील श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्याध्यक्ष संपत देसाई म्हणाले, जातीच्या आधारावर समाजात भेद केला जातो आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या एकजुटीत अडथळा येतो. आमच्या जातीमुक्ती लढ्यासाठी जाती व्यवस्थेचा अंत हे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हाध्यक्ष मोहन अटपट, नजीर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्य कार्यालय प्रमुख संतोष गोटल, राज्य निमंत्रक डी. के. बोडके, मारुती पाटील, शरद जांभळे, जयंत निकम, कृष्णा पाटील, मोहन अनपट, आनंदराव पाटील, नजीर चौगुले, पांडुरंग पवार, जगन्नाथ कुडपुडकर, दाऊद पटेल, पंजाबराव पाटील, डॉ. चिदानंद आवळेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT