Fig-Sitafal Research Centre : जाधववाडीचे अंजीर-सीताफळ संशोधन केंद्र होतेय लोकाभिमुख

Fig-Sitafal : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील जाधववाडी येथे सुरू करण्यात आले आहे.
Fig Sitaphal
Fig SitaphalAgrowon
Published on
Updated on

Fig-Sitafal Production : राज्यात सीताफळाची लागवड झपाट्याने होत असून, सध्या या फळपिकाखालील क्षेत्र ७५,००० हेक्टरपेक्षा अधिक आहे. अंजिराची लागवड पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांपुरती मर्यादित असून, राज्यात या फळपिकाचे क्षेत्र आठ हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे.

या फळपिकांची लागवड पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात नगदी पिके म्हणून केली जाते. तालुक्यातील जाधववाडी, काळेवाडी, झेंडेवाडी, दिवे, सोनोरी, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, वनपुरी, सोमुर्डी, वाल्हे या गावांत या पिकाची लागवड केली जाते.

महाराष्ट्रातील अंजिराच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ८०-८५ टक्के क्षेत्र पुरंदर तालुक्यातच एकवटलेले आहे. येथील अंजीर ‘राजेवाडी अंजीर’ या नावाने प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यान्वयीत झाल्याने तेथे सुमारे ४५,००० हेक्टर क्षेत्र पाटपाण्याखाली आले असून, या दोन्ही पिकांखालील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

Fig Sitaphal
Fig Processing : पौष्टिक अंजिरापासून जाम, जेली, टॉफी

लागवडीच्या प्रसारासोबत अंजीर, सीताफळावरील संशोधनामध्ये प्रामुख्याने वाण संकलन, जतन, सुधारित लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान अशा बाबींचा अभ्यास करण्याची गरज लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषद,

नवी दिल्लीमार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत जाधववाडी येथे अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू फळपिके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प सन २००९ मध्ये स्थापन केले आहे.

संशोधन केंद्रावर सीताफळाच्या ७० हून अधिक, तर अंजिराच्या आठ जातींची लागवड करण्यात आली आहे. या संशोधन केंद्राने अंजीर व सीताफळ पिकामध्ये अनुक्रमे ‘फुले राजेवाडी’ व ‘फुले पुरंदर’ या जाती विकसित केल्या आहेत.

Fig Sitaphal
Sitafal Processing Industry : सीताफळ प्रक्रिया उद्योगातील सयंत्राची चाके रूतलेलीच

केंद्राचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. प्रदीप दळवे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे, वरिष्ठ संशोधन साहाय्यक सुनील नाळे व नितीन घोडके तत्पर असतात. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भगवान ढाकरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड तसेच केंद्रीय कोरडवाहू फळपिके संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे यांचे मार्गदर्शन लाभते आहे.

- डॉ. युवराज बालगुडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ ९८९०३८०६५४

मागील पाच ते दहा वर्षांत अंजीर व सीताफळांच्या लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या संशोधन केंद्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी, विद्यार्थी येथे भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेत आहेत.
डॉ. प्रदीप दळवे, उद्यानविद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू फळपिके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com