Marathwada Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Water Issue : बियर कंपन्या जगवायच्या आणि शेती उजाड करायची का?

मुकूंद पिंगळे

Nashik News : छत्रपती संभाजीनगर मधील बियर कंपन्या जगवायच्या आणि नाशिक जिल्ह्यातील बारमाही बागायती शेती उजाड करायची, ही कूटनीती आहे. मराठवाड्याला गंगापूरचे पाणी सोडले, तर आम्ही द्राक्षबागा कशा जगवायच्या? बँका व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे?

बारा वर्षे झाले, अजूनही मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे पुर्नसर्वेक्षण झालेले नाही.यंदा दुष्काळाने मारले. आता गंगापूर डाव्या कालव्यावरील शेती उजाड होणार काय, असा संतप्त सवाल कसबे सुकेणेसह बाणगंगा काठच्या गंगापूर डाव्या कालव्यावरील गावांनी उपस्थित केला आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त झाला आहे. गंगापूर धरणाच्या डावा कालवा वितरिका लाभक्षेत्रात निफाड तालुक्यातील ओझर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपरी या गावांचा समावेश आहे. या गावांतील शेती व पिण्याचे पाणी गंगापूर धरणावर अवलंबून आहे. दरवर्षी या गावांसाठी पिण्याचे पाण्यासाठी आवर्तन सोडले जाते.

यंदा गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि निफाड तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळ पडला आहे. नाशिक जिल्ह्याचा द्राक्षपट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या बाणगंगा काठच्या गावांत कोट्यवधी रुपये गुंतवणुकीची द्राक्ष, गुलाब, फळ-फूल, भाजीपाला शेती शेतकरी बारमाही करतात. कमी पावसामुळे व जायकवाडीत पाणी सोडल्यावर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे हा परिसर उजाड होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

पिके जळून जातील; मग कर्ज कसे फेडायचे?

गंगापूर डावा कालव्यावर कसबे सुकेणे ते ओझरदरम्यान सुमारे दहा पाणी वापर संस्था अवलंबून आहेत. पाणी वापर संस्थांच्या अधिपत्याखाली परिसरातील शिवार ओलिताखाली येतो. जायकवाडी धरणात गंगापूर धरणाचे पाणी सोडल्यास भीषण जलसंकट तयार होऊन फळ, फूल व द्राक्षबागा जळून जातील. आम्ही बँका, सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

ओझर ते कसबे सुकेणे परिसरातील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. शेती शिवारातील सर्व विहिरींनी तळ गाठला आहे. डावा कालव्यावर १० पाणी वापर संस्था आहेत. गंगापूर धरणातून आम्हाला पाणी न मिळाल्यास परिसरातील शेती उजाड होईल. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्यास आमचा विरोध आहे.
- धोंडीराम जाधव, संस्थापक अध्यक्ष-भैरवनाथ पाणी वापर संस्था, कसबे सुकेणे
मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा आहे. मुळात जायकवाडी धरणाची निर्मिती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. १२ वर्षांनंतर मेंढेगिरी समितीनुसार फेरसर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षण होत नसून सध्या जायकवाडी धरणात दोन वर्षेपुरेल इतके पाणी आहे. चुकीच्या अहवालाचा आधार घेत जायकवाडीत पाणी सोडण्याचा आग्रह मराठवाड्यातून होत आहे, हे अतिशय चुकीचे आहे. गंगापूर डावा कालव्या क्षेत्रातील सर्व बागायती क्षेत्र उजाड होईल. त्यामुळे आमचा जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध आहे.
- अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT