Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : रब्बी हंगामापूर्वीच युरियाची टंचाई

Urea Fertilizer : खानदेशात रब्बी हंगामास हवी तशी सुरुवातदेखील झालेली नाही. त्यातच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. ही कृत्रीम टंचाई असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, सहा युरियाच्या गोण्यांसमवेत एक मिश्र खताची गोणी घेण्याची सक्ती काही केंद्रचालक करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात रब्बी हंगामास हवी तशी सुरुवातदेखील झालेली नाही. त्यातच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. ही कृत्रीम टंचाई असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, सहा युरियाच्या गोण्यांसमवेत एक मिश्र खताची गोणी घेण्याची सक्ती काही केंद्रचालक करीत आहेत.

केळी, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड सुरू आहे. तसेच अनेक केळी बागा वाढीच्या स्थितीत आहेत. यामुळे जिल्ह्यात खतांची मागणी कायम आहे. खरिपातही खतटंचाई होती. आता रब्बीतही त्याच समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

काही कंपन्या आपल्या युरियासमवेत न खपणारी खते कृषी केंद्र, वितरकांच्या माथी मारत आहेत. यामुळे ही लिंकिंग सुरू झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्हा रासायनिक खतांच्या वापरात आघाडीवर आहे. केळी, भाजीपाला पिकांसाठी बारमाही खते, विद्राव्य खतांची मागणी असते. केळीसाठी युरिया, पोटॅश व मिश्र खतांची खरेदी शेतकरी करून ठेवतात.

एकाच वेळी सर्व खते खरेदीवर शेतकऱ्यांचा भर असतो. तर शेतकरी ज्वारी, बाजरी, मका पेरणी करतानाच रासायनिक खतांची पहिली मात्रा देतात. परंतु हंगाम जेमतेम सुरू होत असतानाच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. युरियाचा साठा पुरेसा असल्याची बतावणी कृषी विभाग सतत करीत आहे. परंतु युरियाची टंचाई आहे.

युरियाचा सुमारे एक लाख ३० हजार टन पुरवठा खरिपात अखेरपर्यंत अपेक्षित होता. परंतु एवढा पुरवठा झाला नाहाी. पुरवठा रखडत सुरू होता. खत कंपन्या रेल्वेच्या माध्यमातून पुरवठा करतात. मुंबई, गुजरातमधून खतांचा पुरवठा होतो. परंतु हा पुरवठा निर्देशित लक्ष्यांकाच्या तुलनेत खरिपात कमी झाला आहे.

दर महिन्याला युरिया पुरवठ्याचा वेगळा लक्ष्यांक आहे. मेमध्येच एकूण लक्ष्यांकातील २५ टक्के पुरवठा अपेक्षित होता. परंतु अत्यल्प पुरवठा झाला आहे. आता रब्बीतही समस्या आहे. ग्रामीण भागात युरियाची अधिकची टंचाई आहे. लिंकिंगमुळे अधिकचा निधी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT