Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Harvesting : दुष्काळात तेरावा महिना ; ज्वारी काढणीला मजूर मिळेना

Labor Shortage For Jowar Harvesting : आधीच दुष्काळाचे संकट आणि त्यातही कशीबशी पेरणी करून आलेल्या ज्वारी पीकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Team Agrowon

Jalna News : आधीच दुष्काळाचे संकट आणि त्यातही कशीबशी पेरणी करून आलेल्या ज्वारी पीकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशा विचित्र परिस्थितीत सध्या जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातला शेतकरी सापडला आहे.

यंदा मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. कमी पावसाअभावी रब्बीच्या पेरण्यांना उशीर झाला. दुष्काळी स्थिती असतानाच झालेल्या अवकाळी पाऊस झाला. रानं मोकळी राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली. यातून काही उत्पन्न मिळेल शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी भागेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली.

दुष्काळात तेरावा महिना

हंगाम संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या जोरावर ज्वारी लावली. आता ज्वारीचे पीक काढणीला आले आहे. मात्र, काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाल्याचे चित्र आहे.

यंदा तालुक्यात आठ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे तशी संपलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात काम मिळत नसल्याने अनेक मजूर कामाच्या शोधात सकाळीच शहरात जात आहेत. त्यामुळे ज्वारी काढणीसाठी मजूर शोधताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत.

रोजंदारीपेक्षा गुत्तेदारीकडे कल

रोजंदारीवर काम करण्यापेक्षा मजूर कामाचे गुत्ते घेत आहे. गुत्त्यांच्या कामांतून मजूरांना दिवसाचे हजार ते बाराशे रुपये सुटतात. त्यामुळे अनेक मजूर शहरात काम शोधताना दिसत आहेत.

शेतकरी स्वत:च मळणीच्या कामात

दरम्यान, ज्वारी काढल्यानंतर मळणी, पेंढ्या बांधून थप्पी करणे, कणसांची खुडणी करणे, मळणी यंत्र यासाठी ज्वारीला शेवटच्या टप्प्यात लागतो. मात्र, खर्च करण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:च ज्वारी काढून मळणीची कामे करताना दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberrry Natural Production: स्ट्रॉबेरीचे पूर्ण नैसर्गिक उत्पादन कौतुकास्पद: आयुक्त मंजिरी मनोलकर

Agriculture Incubation Hubs: कृषी विद्यापीठांत इनक्युबेशन सेंटर

Pune Crop Damage: ‘पूर्वमोसमी’ने अडीच हजार हेक्टरवरील पिके बाधित

Gadchiroli Land Issue: सुपीक जमिनी उद्योगांच्या घशात जाऊ देणार नाही: विजय वडेट्टीवार

Banana Crop Damage: वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT