Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या प्रचारासाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

Manisha Ovhale : जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल से नल’ देण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्याच्या प्रबोधनासाठी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार व राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे लघुपट स्पर्धा होत आहेत.

या लघुपटनिर्मिती स्पर्धेसाठी पाण्याचे शाश्‍वत स्रोत, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती, जलसंधारण, हर घर जल घोषित गाव विकास, जल जीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतीसंगम हे विषय राहणार आहेत. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती स्वतः केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्‍वसंगीत, गीत, चित्रीकरण स्वतः तयार केलेले असावे.

अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभागांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट स्पर्धेसाठी सादर करू नयेत. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारे लघुपट याबाबतचे कॉपीराइटबाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाने सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

लघुपट निर्मितीसाठी वापरलेले शूटिंग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. सदर लघुपट स्पर्धेत सहभाग नोंदवून ३० डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर येथे आपला लघुपट पेनड्राइव्हमध्ये सादर करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

३१, २१ आणि ११ हजारांची बक्षिसे

लघुपट स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला एकाच विषयावरील लघुपट सादर करता येईल. लघुपट तीन ते पाच मिनिटांचा असावा. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार व ११ हजार रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT