Crop Competition : कृषी विभागची बक्षिस योजना जाहीर, पीक स्पर्धेत भाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Rabbi Season : रब्बी हंगामात पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन कृषी विभागाने केले.
Crop
CropAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘कृषी विभागामार्फत ‘रब्बी हंगाम २०२३’मध्ये पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी ही स्पर्धा होत आहे. पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन कृषी विभागाने केले.

Crop
Pune Rabbi Season : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३०,३६२ क्विंटल बियाण्यांची मागणी

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत पीकस्पर्धा राबविण्यात येते.

पीक स्पर्धा तालुका स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येईल. सर्वसाधारण गटास ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असेल.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सात बारा, आठ -अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा, बँकेचा चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषीच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com