Maharashtra Kesari Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari : शिवराज राक्षे-पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील कुस्तीची होणार चौकशी

Maharashtra Kesari Controversy : अहिल्यानगर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील कुस्तीचा पंचाने निकाल चुकीचा दिल्याचा आरोप झाला.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : अहिल्यानगर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील कुस्तीचा पंचाने निकाल चुकीचा दिल्याचा आरोप झाला. त्यावरून राज्यभर टीकेची झोड उठली. त्यामुळे आता या दोघांत गादी विभागातील अंतिम झालेल्या कुस्तीची राज्य कुस्तीगीर महासंघ चौकशी करणार आहे. त्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

दहा दिवसांत समितीने अहवाल द्यावा, असे कुस्तीगीर संघाने सांगितले आहे. त्यामुळे आता चौकशीत नेमके काय स्पष्ट होतेय याकडे राज्यातील कुस्तीगिरांचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या पुढाकाराने ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्यातील किताबी कुस्तीत पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’ ठरला.

मात्र त्याआधी गादी विभागावरील डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम कुस्तीवरून वादंग झाले. या कुस्तीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबुलिया, मॅट चेअरमन म्हणून शासकीय कोच दत्तात्रय माने व साइड पंच म्हणून विवेक नाईकल यांची नेमणूक करण्यात आली होती.

यामध्ये शिवराज राक्षे याला पंचानी चितपट झाल्याचा निर्णय दिला. मात्र या वेळी कुस्ती चितपट झाली नाही. असा आक्षेप घेत पंचानी रिप्ले दाखवून निर्णय देण्याची मागणी केली. मात्र पंच कमिटीने तो निर्णय फेटाळला. यावरून मैदानावरच राडा झाला. राक्षे यांनी मारहाण केल्याचा आरोप करत पंचानी कारवाईची मागणी केली.

त्यानंतर महासंघानेही राक्षेवर तीन वर्षांसाठी कारवाई केली. असे असले राक्षे व मोहोळ यांच्या कुस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर, माध्यमातून फिरू लागले. वशिलेबाजी झाल्याचा आरोप करत राज्यभर टीकेची झोड उठली आहे. शिवराज राक्षे यांनाही सतत अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

या कुस्तीच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली असून त्यात प्रा. दिनेश गुंड (पुणे), सुनील देशमुख (जळगाव), नामदेव बडरे (सांगली) व विशाल बलकवडे (नाशिक) हे सदस्य असतील.

चौकशी समिती आखाडा प्रमुख, जज्ज, कुस्तीसाठी नियुक्त पंच आदींची चौकशी करून कुस्तीतील चितपट निर्णयाच्या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे २८ फेब्रुवारीपूर्वी अहवाल सादर करणार आहेत.

दरम्यान, किताबी अंतिम लढतीतील उपविजेता महेंद्र गायकवाड यांच्यावरही कारवाई केलेली असल्याने उपविजेता असूनही अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे राक्षे-मोहोळ यांच्या कुस्तीबाबतच्या चौकशीत काय सत्य बाहेर येईल याकडे राज्यातील कुस्तीगीर आणि कुस्तीप्रेमीचे लक्ष लागले आहे.

राक्षेंनी हरकत नोंदवली नाही

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी सांगितले, की गादी विभागावरील डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम कुस्तीवरून गदारोळ झाला. मात्र शिवराज राक्षे यांनी अजूनही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे कोणतीही हरकत नोंदवलेली नाही. परंतु समाजात या निकालावरून होत असलेल्या उलट चर्चेचा विचार करुन चौकशी समिती नियुक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT