SustainableFarming: खरीप भाताच्या रोपवाटिकेची तयारी ज्या भागात भात रोपवाटिका पेरणीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, त्या भागात गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू करावी. पेरणी करताना प्रति गुंठा १ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३.३३० किलो मिश्रखत (१५:१५:१५) खत जमिनीत मिसळून द्यावे. खतांचा बियाण्याशी थेट संपर्क येणार नाही यासाठी खते जमिनीत चांगली मिसळावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. .बियाण्याची पेरणी गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर १० सें.मी. अंतरावर ओळींमध्ये सुमारे २.५ सें.मी. खोलीवर करून मातीने झाकावी.भात रोपवाटिकेसाठी बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रति गुंठा ४ किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी ६ किलो आणि संकरित जातींसाठी २ किलो बियाणे वापरावे.भात रोपवाटिकेची पेरणी होऊन १५ दिवस पूर्ण झाले असल्यास, प्रति गुंठा १ किलो युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा. (टीप : पावसाची तीव्रता कमी असताना किंवा पावसाची उघडीप असताना खताची मात्रा द्यावी.)भात रोपांच्या पुनर्लागवडीसाठी भात खाचरांची पूर्वमशागत करून शेत तयार ठेवावे..Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका.रहू पद्धतीने भात रोपवाटिकाभाताची रोपवाटिका लवकर तयार होण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची (रहू पद्धत) पेरणी करावी. यासाठी आवश्यक तेवढे भात बियाणे स्वच्छ गोणीत भरून ती गोणी २४ तास पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवावी. त्यानंतर गोणी पाण्यातून काढून न सोडता तशीच सावलीत किंवा खोलीत १२ ते २४ तास ठेवावी..Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय.त्यामुळे आतील बियाण्यांना मोड येतील. या मोड आलेल्या बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. मोड आलेली बियाणे गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर १० सें.मी. अंतरावर ओळींमध्ये पेरावीत. बियाणे सुमारे २.५ सें.मी. खोलीवर टाकून हलक्या मातीने झाकावीत. पेरणीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर टाळावा. .पेरणीनंतर १० दिवसांनी शिफारशीनुसार प्रति गुंठा १ किलो युरिया द्यावा. रोपवाटिकेत एकसारखी उगवण व निरोगी रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक तेवढा ओलावा कायम राखावा. पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.- डॉ. यशपाल चव्हाण, ८१४९४६७४०१(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.