Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : सरकार इथले पाणी अदानींना विकतयं; कोल्हापुरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचे महायुतीवर टीकास्त्र

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी दिग्गजांच्या प्रचारतोफा आजपासून धडाडायला सुरूवात झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर येथे सभा झाली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास वेग आला असून महाविकास आघाडीच्या मोठ्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बारामती मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरमधून रणशिंग फुकले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर रोजदार टीका करताना, सरकार येथील पाणी अदानींना विकत असल्याचा आरोप मंगळवारी (ता.५) केला. यावेळी ठाकरे यांनी लाडकी बहीण, महागाई, न्यायव्यवस्था, शिवाजी महारांजाच्या पुतळ्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. तसेच कोल्हापुरची जबाबदारी आपण सतेज उर्फ बंडी पाटील यांच्याकडे देत असल्याचे जाहीर केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातून अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांची राधानगरी मतदारसंघातील अदमापूर येथे शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचाराची सभा झाली.

जिल्ह्यात चांगली सुरूवात झाली असून आता गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मधल्या काळात काळात ग्रहण लागले होते. यामुळे आता आपली माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनाचे आहात. तुम्ही गद्दारांना आमदार केलंत. पण यांनीच तुमच्या पाठीवर वार केले. पण आता बस या गद्दार खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी महायुती सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे यांनी, जिल्ह्यातील पाणी अदानीला विकलं जात असल्याची माहिती के पी पाटील यांनी दिली. पण आपल्याला वाटतं होतं अदानीला मुंबई विकली जात आहे की काय. येथे तर संपूर्ण महाराष्ट्र अदानीला फुकट दिला जातोय, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महायुतीचे सरकार टक्केवारी आणि खोके वाल्यांचे आहे. यांना निवडणूक जवळ आल्यावर बहीण दिसायला लागली. पण बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचाराच्या घटनेत पोलिस निर्ढावले होते. ते पीडितांच्या आईची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत होते. त्यावेळी बहीण का दिसली नाही, असा सवाल ठाकरे यांनी जाहीर सभेतून केला आहे. तसेच जर लाडकी बहीण योजनेमुळे कुणाचे घर चालत असेल आणि असे कोणी मला सांगितलं तर महायुतीच्या विरोधात एकही उमेदवार उभा करणार नाही, असे ओपन चँलेंज उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आपण आणणारच असून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारू. जसे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते तसेच ठेवू. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर डाळ, तेल, साखर, तांदूळ सारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार नाहीत असे काम करू, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. तसेच कोल्हापुरमधील मविआच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी आपण सतेज पाटील यांच्यावर देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT