Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा परताव्यावरून शिवसेनेकडून अधिकारी धारेवर

Crop Insurance Scheme : हवामान आधारित फळपीकविमा योजनेचा जोखीम कालावधी संपल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अजूनही फळपीक विमा परताव्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ३१ हजार ४५४ आंबा, काजू बागायतदारांना फळपीक विमा परतावा अद्याप न मिळाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ९) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. या वेळी चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

हवामान आधारित फळपीकविमा योजनेचा जोखीम कालावधी संपल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अजूनही फळपीक विमा परताव्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, ईर्शाद शेख, अमित सामंत, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कृषी तंत्र अधिकारी शरद काळे आल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. शेतकऱ्यांनी आपला हिस्सा विमा कंपनीकडे भरला मग अजूनही राज्य आणि केंद्र शासन आपला हिस्सा का भरत नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कधी जमा होणार, सद्यःस्थिती काय आहे, असे अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.

काजू बीला दिले जाणारे अनुदानदेखील तातडीने शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी आयुक्त पातळीवर यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याची रक्कम मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

काजू बागायतदारांची देखील मागणी मान्य

सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर काजू बागायतदारांनी सुरू केलेले धरणे आंदोलन बुधवारी (ता. ९) सायकांळी स्थगित करण्यात आले. जीएसटी पावतीची अट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा पणनमंत्र्याशी चर्चा केल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसे लेखी पत्र देखील बागायतदार संघाला देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT