Mazi Vasundhara Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Mazi Vasundhara Abhiyan Nashik : ‘माझी वसुंधरा’मध्ये शिरसाटे ग्रामपंचायत प्रथम

Team Agrowon

Nashik News : राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याची कामगिरी राज्यात अव्वल ठरली आहे.

‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षिस पटकाविले. तब्बल तीन ग्रामपंचायतींचा सन्मान झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम तर नाशिक तालुक्यातील शिंदे व निफाड तालुक्यांतील विंचूर ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या गटात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हा सन्मान स्वीकारला.

मुंबई येथील नरिमन पॉईट जवळील टाटा थिएटर येथे आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. ५) या पुरस्कारांचे वितरण झाले.

‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. निफाड तालुकयातील पिंपळगाव बसवंत

ग्रामपंचायतीने सलग दोन वर्षे राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर दुसऱ्या वर्षी निफाड तालुक्यातील चांदोरी व इगतपुरीतील शिरसाटे ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला होता. अभियानाच्या अमंलबजावणीत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यंदा जिल्हा परिषद राज्यात तिसरी ठरली.

शिरसाटे (ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला. लोकसंख्या २ ते ५ हजार शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून लोकसंख्या ५ ते १० हजार शिंदे ग्रामपंचायत तृतीय तर लोकसंख्या १० हजारांपेक्षा जास्त विंचूर तृतीय आली. भूमी घटकाबाबत शिरसाटेला विशेष पुरस्कारही मिळाला आहे.

या अभियानात नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या मध्ये शून्य ते २५०० लोकसंख्या गटात शिरसाटे, ५ हजार ते १० हजार गटात नाशिकमधील शिंदे, तर १० हजारांवरील गटात निफाडमधील विंचूर ग्रामपंचायतीने बाजी मारली.

उत्कृष्ट नियोजन म्हणून आशिमा मित्तल यांचा सन्मान झाला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, डॉ. वर्षा फडोळ, शिंदेचे ग्रामसेवक सुरेश भोजने, शिरसाटेचे सरपंच गोकूळ सदगीर, शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव, विंचूरचे ग्यानदेव खैरनार, रवींद्र बाराथे, हर्षल देसाई आदी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्याला ३ राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यापुढेदेखील अभियानात जिल्ह्यात चांगले काम करून पर्यावरणपूरक गाव तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT