नगर ः जागतिक पर्यावरण बदल (Climate Change) परिषद ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील एकूण २०० हून अधिक देशांचा या परिषदेत सहभाग असून त्यात महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभागही (Environment Department) यात सहभागी झाला आहे.
या परिषदेत कर्जत (जि. नगर) येथे करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमातून करण्यात आलेल्या कामाचा उल्लेख करत गौरव केला आहे. परिषदेत कर्जतमध्ये करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण दाखवण्यात आले.
राज्यात तीन दोन वर्षांपासून ‘माझी वसुंधरा’ अभियान उपक्रम सुरू झाला. या उपक्रमातून राज्यात अनेक शहरात पर्यावरणपूरक कामे केली जात आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील कर्जत शहराचाही समावेश आहे. कर्जतमध्ये माझी वसुंधराअंतर्गत सर्व सामाजिक संघटना, नगरपंचायत व सक्रिय लोकसहभागातून ५० हजार पेक्षा अधिक वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसीटी, डीप सीसीटी, सायकल ट्रॅक, गार्डन, रस्त्यालगतची वृक्ष लागवड इत्यादी कामे केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची सर्वोच्च पातळीवरील जागतिक पर्यावरण बदल परिषद ६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील एकूण २०० हून अधिक देशांचा या परिषदेत सहभाग असून त्यात महाराष्ट्र राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सहभागी झाला असून कर्जतमधील कामाचा या परिषदेत उल्लेख करत सादरीकरण दाखवण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.