Electricity Problem Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Electricity Supply Problem : शिरापूर योजनेला वीज वितरणकडून ‘खो’

Electricity Supply Issue : उत्तर सोलापूर तालुक्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शिरापूर योजनेला वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे ग्रहण लागले आहे.

Team Agrowon

Vadala/Solapur News : उत्तर सोलापूर तालुक्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शिरापूर योजनेला वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे ग्रहण लागले आहे. शिरापूर योजनेसाठी शिरापूर येथील पंपगृहास होणारा वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. यामुळे रानमसले वितरिकेची चाचणी लांबणीवर पडली आहे.

सध्या ऐन उन्हाळ्यात बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडले आहे. तरीही विजेअभावी शिरापूर योजनेस पाणी उपसा करताना खंड पडला जातो की पाडला जातोय, याचा शोध घेण्याची वेळी आली आहे.

कारण बीबीदारफळ, रानमसले, नान्नज, वडाळा, अकोलेकाटी, कारंबा परिसरात योजनेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. शिरापूर योजनेसाठी लांबोटी उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. परंतु येथून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे.

यामुळे उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांना शिरापूर योजनेचे पाणी मिळेना गेले आहे. यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. सतत होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हक्काच्या पाण्यावर डल्ला

सीना नदीत बोगद्यातून पाणी सोडले जाते. यावरच शिरापूर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. शिरापूर उपसा सिंचन योजनेचे हक्काचे एक टीएमसी पाण्यावर कधी वीज पुरवठा खंडित करून तर कधी बोगद्यातून कमी दाबाने पाणी सोडून इतर ठिकाणीच डल्ला मारला जातो.

याकडे उजनी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता व वीज वितरण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता हे गांभीर्याने पाहत नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात शिरापूर योजना केवळ नावापुरतीच उरते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे योग्य दाबाने शिरापूर योजनेतून पाणी उपसा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत लांबोटी वीज वितरण विभागास कल्पना देऊनही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे रानमसले वितरिका चाचणी तसेच तलाव भरून घेण्यास अडचण निर्माण होत आहे.
बाळासाहेब जाधव, सहायक अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. १६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT