Electricity Bill Payment : घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढला कल

वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्राधान्य मिळत आहे.
Electricity Bill Payment
Electricity Bill PaymentAgrowon
Published on
Updated on

Electricity Bill Payment छत्रपती संभाजीनगर : वीजबिलात मिळणारी सवलत (Electricity Bill Concession) आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन (Online Bill Payment) भरण्यास प्राधान्य मिळत आहे. मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३ लाख ५१ हजार ९५७ ग्राहकांनी ८४ कोटी ४ लाख रुपयांच्या वीजबिलांची ऑनलाइन भरणा केला.

महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाइटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या वेबसाइट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

Electricity Bill Payment
Electricity Price Hike : वीजदरवाढीचे गौडबंगाल नेमकं काय आहे?

महावितरणच्या वीजबिले ऑनलाइन भरण्याच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे.

Electricity Bill Payment
Agriculture Electricity News : शेतीसाठी स्वतंत्र वीज कंपनी सुरू करा; नियामक आयोगाची सरकारला सूचना

छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात १ लाख ७४ हजार ३८५ ग्राहकांनी ४५ कोटी ७३ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात १ लाख २५ हजार ३९ ग्राहकांनी २६ कोटी ६१ लाख तर जालना मंडलात ५२ हजार ५३३ ग्राहकांनी ११ कोटी ७० लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.

Electricity Bill Payment
Pending Electricity Bill : थकित वीजबिलावर आता वीस टक्के सवलत

बिलात ०.२५ टक्के सूट

ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

तत्काळ मिळते पोच

वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com