Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : तेल्हाऱ्यात शेतकरी संघटनेचा अतिवृष्टीच्या मदतीसाठी ‘ठिय्या’

Heavy Rain Crop Loss : महाराष्ट्र शासनाने २०२२-२३ मध्ये अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. मात्र, या मदतीपासून काही गावांतील शेतकरी वंचित राहिले आहेत.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र शासनाने २०२२-२३ मध्ये अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. मात्र, या मदतीपासून काही गावांतील शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १३) दुपारी ठिय्या आंदोलन केले.

कृषी विभागाने तयार केलेल्या याद्या मदतीस पात्र शेतकऱ्यांच्या असल्या तरी त्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्यापैकी बांदखेड, सौंदळा या गावांमधील २१४ पैकी ८८ शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले. अशीच परिस्थिती वारी, वारखेड, सौंदळा या शिवारांची आढळून आली आहे.

यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांक पोर्टल प्रणालीवरून प्राप्त करून घेतले पाहिजे व आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी करीत बांदखेड, सौंदळा येथील शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेने तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन केले.

मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आली, असे पत्र प्रशासनाने या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांना तहसीलदारांच्या स्वाक्षरीने दिले.

आंदोलनात सतीश देशमुख, विनोद मोहोकार, भालचंद्र फोकमारे, योगेश रहाणे, भास्करराव कोरडे, हिमायत हुसेन, जिजाबाई वानखडे, गंगा खंडेराव आदी सहभागी होते.

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी असे आंदोलन प्रत्येक तहसीलजवळ केले जाईल. यंत्रणांनी तातडीने उपरोक्त विषयावर तोडगा काढावा.
- ललित बहाळे, राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विजेवर चालणारा बहुउद्देशीय टिलर

Transformer Theft: मुळशी तालुक्यात रोहित्र चोरट्यांचा धुमाकूळ

Market Committee Irregularities: बाजार समिती गैरव्यवहार अहवाल थातुरमातूर का?

Paddy Transplanter: भात रोप लागवडीसाठी सुधारित यंत्रे

Fertilizers Industry Investment: निविष्ठा उद्योगात गुंतवणूक केली नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT