Nashik Tomato Rate : टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवडीपश्चात आता फळ तोडणी सुरू झाली असताना तोडणी केलेला माल बाजारात न्यायलासुद्धा परवडत नाही, अशी बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे उद्विग्न होत येथील विजय खेलुकर या शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या आणि जनावरे चरायला सोडली.
श्री. खेलुकर यांनी एक एकरमध्ये दीड लाख रुपये खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सुरुवातीच्या ५० जाळ्यांना फक्त ३० रुपये प्रतिजाळी असा भाव मिळाला. त्यामुळे उद्विग्न झालेले खेलकर यांनी १८०० हून अधिक जाळी असलेल्या तयार पिकात मेंढरे, तसेच जनावरांना खाद्य म्हणून सोडून दिले.
बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी टोमॅटोच्या पिकात मेंढरे चरताना दिसत आहेत. टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारात नेण्यासाठी तोडणी, हाताळणी, प्रतवारी व वाहतूक खर्च मिळून साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपये खर्च होतो.
काही शेतकऱ्यांची खर्चाचीदेखील तोंड मिळवणी होत नसल्याने पीक सोडून देण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. एक एकर टोमॅटो पिकासाठी साधारणतः दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असून, बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडून कर्जबाजारी झाला आहे.
दरम्यान, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, वीस किलो टोमॅटोला ३० ते १५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यातच, वाढत्या तापमानामुळे फळे लवकर परिपक्व होत असल्याने आवक वाढत आहे. मागणी कमी व परराज्यातील व्यापारी कमी असल्याने बाजारभाव गडगडल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.