Tomato rate
Tomato rateAgrowon

Tomato Rate : संतप्त शेतकऱ्यांचा टोमॅटो, कांदे रस्त्यावर ओतून ‘रास्ता रोको’

Vegetable Market Rate : गारपीटग्रस्त बागलाणला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ही शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलनात सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

Nashik News : शेतकऱ्यांचे मरण हेच या शासनाचे धोरण आहे. दीड महिना उलटूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत जाहीर झाली नसल्याने शुक्रवारी (ता. १९) डांगसौंदाणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत बाजार समितीचे संचालक व शेतकरी नेते संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केळझर फाट्यावर टोमॅटो, कांदे रस्त्यावर ओतून रास्ता रोको आंदोलन केले.

गारपीटग्रस्त बागलाणला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ही शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी आंदोलनात सरकार विरोधी घोषणाबाजी केली. एप्रिल महिन्यात ९ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळीने या भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

Tomato rate
Tomato Market : आता नकोच ‘लाल चिखल’

या भागातील प्रमुख पीक असलेले उन्हाळ कांदा संपूर्णपणे जमिनीतच सडला, तर टोमॅटो, मिरची पीक भुईसपाट झाल्याने या भागातील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गत ७० वर्षांत अशी गारपीट झाली नाही. या गारपीटीची दखल घेत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी तालुक्याच्या शेती बांधावर येऊन या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Tomato rate
Tomato Rate : आवक घटूनही टोमॅटो दरात घसरण

त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करत प्रस्ताव पाठवले. या संपूर्ण घटनेला आता एक महिना पूर्ण होऊन देखील शासनाने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत दिली नाही जाहीर ही केली नाही.

शासनाच्या या कारभारावर संतप्त होत सकाळी अकराला डांगसौंदाणेसह पंचक्रोशीतील निकवेलचा. पाडे, दहिंदुले, भिलदर, तळवाडे, साकोडे आदी गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com