Sangharsh Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar News : मुख्यमंत्र्यांनी काम नाही केलं तर कार्यक्रम करायचा..; शरद पवारांचा इशारा

Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजपासून पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.

Swapnil Shinde

Sharad Pawar Warns : कंत्राटी नोकर भरती असो, अवाजवी परीक्षा शुल्क असो, शाळा दत्तक योजना असो, समूह शाळा योजना असून, नोकर भरतीचा भ्रष्टाचार थांबवणं असो या युवकांच्या मागण्या आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारणा करू. त्यांनी काम केलं तर अभिनंदन करू नाही केलं तर काय कार्यक्रम करायचं ते ठरवू, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून सुरुवात झाली. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी शरद पवार यांनीमार्गदर्शन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. फौजिया खान, आमदार अशोक पवार, रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, काँग्रेसचे नेते रमेश बागवे, माजी आमदार विद्या चव्हाण, जयदेव गायकवाड, कुमार सप्तर्षी, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, युवा संघर्ष यात्रेची सुरुवात व्हायच्या आत सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला. सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने ही यात्रा काढणाऱ्या तरुणांवर त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर दुर्लक्ष करण्याची भूमिका कोणी घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही सरकारला चुकवावी लागेल.

कंत्राटी भरती, अवाजवी परीक्षा शुल्क, जातीनिहाय जनगणना, सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी, या मागण्यासाठी रोहित पवार युवा संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा पुणे ते नागपूर असा हा ८०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव असा यात्रा काढण्यात येणार आहे. तर ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT