Sharad Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा, पाणीसाठ्यावर व्यक्त केली चिंता

sandeep Shirguppe

Sharad Pawar Maharashtra Drought : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याती दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच अनेक तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान राज्य सरकारकडून याची गंभीर दखल घेण्यात यावी यासाठी माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला आवाहन केलं.

महाराष्ट्रमध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे राज्यामध्ये एकूण १९ जिल्हे त्यातले ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सोळा तालुक्यात आहे एकंदरीत विचार केला तर ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता असल्याचे माहिती खासदार शरद पवार यांनी दिली.

तसेच राज्यात भीषण दुष्काळ आहे त्या ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणी पुरवठा होत असल्याने लोकांची वणवण होत असल्याची खंत खासदार पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राती दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात एकंदर २ हजार ९२ मंडळ आहेत यातले पंधराशे मंडळात दुष्काळ राज्यात जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेष विचार केला तर मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत परंतु यातला साठ्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे आहे परंतु या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे छत्रपती संभाजी नगरला ८१ लघु प्रकल्प आहेत इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक राहिल्याची माहिती खासदार पवार यांनी दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये 5.50 इतकाच जलसाठा शिल्लक आहे तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव. छत्रपती संभाजी नगर. अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात हीच परिस्थिती जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी व्यक्त केली.

तर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी

कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु कृषी मंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्याकडे सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचं असल्याचे पवार म्हणाले.

तसेच राज्य सरकारला आम्ही माध्यमांच्या मार्फत जागे करण्याचे आवाहन करत आहे हे करूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला इतर पर्याय असल्याची शरद पवार यांनी थेट इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT