Sharad Pawar : शरद पवार यांचे कांदा प्रश्नावरून मोदींना चोख प्रत्युत्तर, म्हणाले… 'मला प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही काय केलंत ते...'

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसह मुंबईतील सभेत शरद पवार यांच्यावर तोफ डागली होती. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी, कांद्यासाठी काय केले असा सवाल उपस्थित केला होता. यावरून पवार यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : गेल्या काही दिवसापासून राज्यात कांद्याचा प्रश्न गाजत आहे. बुधवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथील पिंपळगावत महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराच सभा झाली. यासभेत मोदींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर शेतकरी आणि कांद्यावरून टीका केली होती. यावरून आता शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी गुरूवारी (ता.१६) पत्रकार परिषद घेत प्रतिसवाल केला आहे. पवार यांनी, मला काय केलं असा सवाल करण्यापेक्षा तुम्ही १० वर्षात शेतकऱ्यांसह कांदा उत्पादकांसाठी काय केलंत याचं उत्तर द्या असे म्हटले आहे. तसेच भर सभेत मोदींना प्रश्न विचारणाऱ्या शेतकरी तरूणाचं कौतुक देखील पवार यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी यंदा आपल्या महाराष्ट्रातील प्रचार सभेदरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पवार हे केंद्रात कृषी मंत्री होते. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. केलं असेल तर ते त्यांनी ते सांगावे अशी टीका केली होती. तसेच बुधवारी (ता. १५) मुंबईत आयोजित रोड शो दरम्यान देखील शेतीवरून पवार यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आज पवारांनी उत्तर दिले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

पवार म्हणाले, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शेतीच्या प्रश्नावर माझ्याकडे येत असत. ते सोडवण्यासाठी मला घेऊन गुजरातला जायचे आणि आता विचारतात मी काय केले? मी माझ्या कार्यकाळात काय केलं हे विचारण्या पेक्षा तुम्ही तुमच्या १० वर्षाच्या काळात काय केलं याचे आधी उत्तर द्या. ते आधी पहावं असा टोला पवार यांनी मोदींना लगावला आहे.

तर इस्त्राइलला जाणाऱ्या मोदींचा विझा नाकारला होता. याची माहिती त्यांनीच मला दिली. तसेच ईस्त्राइलला जाऊन शेतीच्या आधूनिकतेचा अभ्यास करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. तेंव्हा मी त्यांना ईस्त्राइलला घेऊन गेलो. ईस्त्राइलचं शेती तंत्रज्ञान सर्व गोष्टी त्यांना चार दिवस दाखवल्या. हे सगळी माहिती असताना मोदी माझ्यावर आरोप करतात. हे फक्त राजकारण आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : एमपीएससी-यूपीएससी, सारथी, बार्टी, कंत्राटी नोकर भरती अन् भ्रष्टाचारावरून शरद पवार यांचा सरकारला टोला

दरम्यान मोदींच्या जाहीर सभेत त्यांचे भाषण थांबवत कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी करणाऱ्या तरूणाचे पवार यांनी कौतुक केले. किरण सानप असे त्या शेतकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यावरून पवार म्हणाले, धुळे, नाशिक, सातरा भागात कांद्याचे प्रश्न आहेत. मोदी येतात मात्र शेतीच्या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक आहेत. मोदी फक्त राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करतात.

याआधी नाशिकमध्ये काद्यांवरून शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन राष्ट्रीय नेत्यांवर कांदे फेकले आहेत. नाशिकची जनता सुज्ञ आहे. यामुळे असे प्रश्न याआधी देखील विचारले गेले आहेत. यात गैर काय? असा सवाल देखीव पवार यांनी केला आहे. तर कांद्यावरून घोषणाबाजी करणारा शेतकरी किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असून तो आयटी सेलचा पदाधिकारी आहे.

दरम्यान मुंबईसारख्या शहरात रोड शो करण्यावरून देखील पवार यांनी मोदींवर टीका केली. पवार म्हणाले, मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे शहाणपणाचं लक्षण नाही. मोदींच्या रोड शोमुळे लोकांना तासनतास थांबावं लागलं. तर जो रोड शो झाला तो गुजराती परिसरात. इतर ठिकाणी का घेतला नाही? यावरून हेच दिसते की मोदींचे लक्ष फक्त एका वर्गाकडेच आहे. पण या रोड शोमुळे लोकांना खूप त्रास झाला असे पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com