Vegetables Rate : कोथिंबीर, मेथीसह पालेभाज्या भावात वाढ तर वांगी दरात घट, असे आहेत प्रतिकिलो दर

Brinjal Price : वाग्यांच्या दरात चांगली घट, तर आल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आणखी दर उतरण्याची शक्यता आहे.
Vegetables Rate
Vegetables Rateagrowon
Published on
Updated on

Kolhapur Market Rate : मागच्या काही दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने वाढलेल्या फळभाज्यांच्या दरात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घट पहायला मिळाली. वाग्यांच्या दरात चांगली घट, तर आल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आणखी दर उतरण्याची शक्यता आहे, मात्र कोथिंबीर, मेथीसह पालेभाज्यांचे भाव वाढलेलेच आहेत.

फळबाजारात आंब्याची आवक कायम आहे. कोकणी हापूस आंब्याची आवक अंतिम टप्प्यात आल्याने दर वाढत आहेत. त्या तुलनेत कर्नाटक हापूस आंबा स्वस्त आहे. कर्नाटक भागातून आंब्याची मोठी आवक बाजारात होत आहे. कलिंगडला मागणी जोमात सुरू आहे. फणसाची आवक सुरू झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रेते स्टॉल मांडून आहेत.

त्याचबरोबर डोंगराची काळी मैना करवंदे, जांभूळ विक्रीचे हातगाडे शहरात फिरू लागली आहेत. फूल बाजाराची स्थिती सध्या कोमेजलेलेलीच आहे. कमी होणारे खाद्यतेलाचे दर टिकून आहेत. धान्यबाजारातील भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. कडधान्य, डाळींच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला :

टोमॅटो- २० ते ३०, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची-८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - २५ ते ३०, लसूण- २०० ते २४०, आले- १२० ते १४०,लिंबू - २०० ते ६०० शेकडा, गाजर- ५० ते ६०, बीन्स- २०० ते २२०, गवार -८० ते १००, भेंडी-४० ते ५०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २०, कोथिंबीर - ४०, मेथी ३० ते ३५, शेवगा २ ते ३ रुपये नग.

Vegetables Rate
Vegetable Market Rate : कोबी वधारला; काकडी उतरली, कांदा, बटाटा, लसूण स्थिर; आंबा स्वस्त

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १०० ते १२०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १५० ते १८०.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तूरडाळ- १६० ते १८०, मूगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ- १३० ते १४०, हरभरा- ६० ते ७०, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसूर- ७० ते ९० फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला-१४० ते १६०.

पांढऱ्या कांद्याला मागणी कडक उन्हाळ्यात चटणीच्या हंगामात पांढऱ्या कांद्याला मागणी असते, मात्र ऐन हंगामात ही आवक फारशी नव्हती. आता हंगाम आटोक्यात आला असताना आवक वाढली आहे. त्यामुळे पुन्हा मागणी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com