Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : राज्यातील शेतकरी आणि कांदा प्रश्नावरून शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. येथे महाविकास आघाडीने बाजी मारली. तर देशाची पुन्हा एकदा सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएच्या हातात गेली आहे. यादरम्यान राज्यासह देशातील शेतकरी आणि व्यापारी भाजपच्या विरोधात होता. तर या स्थितीत अद्याप बदल झालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फायदा आपल्याला होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची शनिवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, देशातील जनतेनं भाजपच्या हातात सत्ता दिली. शेतकऱ्यांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. भाजपणे आणि पंतप्रधान मोदींनी काही शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर आनंद झाला असता. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे देशातील व्यापारी आणि शेतकरी आज नाराज आहे. भाजपच्या शेतीविरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी आणि व्यापारी नाराज आहे. तो काल ही होता. तर ही नाराजी ऐवढ्यापुरतीच मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

तसेच मोदी यांचे नाव घेता पवार यांनी टोला लगावला आहे. पवार म्हणाले, येथे वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या सभा झाल्या. देशाचे पंतप्रधान मोदींनी देखील घेतल्या. पण त्यांचा त्यांना फायदा झाला नाही. तर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात देखील ते राज्यात सभा घेतील. ते येथे जेवढ्या सबा घेतील तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ. त्यामुळे मोदींना आम्ही धन्यवाद देतो.

सत्तेच्या गैरवापरातून भाजपने काय केले हे जनतेनं बघतीलं. त्यामुळेच लोकांनी भूमिका घेतली. पण मोदी शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. मात्र त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळेच तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील. अजितदादांच्या ब्रँड व्हॅल्यूवर झालेल्या टीकेवर देखील पवार यांनी टोला लगावताना महायुतीतील नेत्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यावर आम्ही काय बोलणार असा टोला लगावला आहे.

याआधी देखील राज्यातील कांदा आणि शेतकरी प्रश्नावरून शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. पवार यांनी त्याच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स ट्विटरवरून काद्यांच्या पडणारे दर आणि नाफेडच्या अवस्थेवरून टीका केली. कांद्याचे दर नियंत्रण वाणिज्य मंत्रालयामार्फत स्वतःकडे ठेवून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चोहोबाजूने मरण होत असताना राज्यातील महायुती सरकार मात्र मौनाची भूमिका निभावत आहे.

भाजपला इशारा

तसेच कांदा प्रश्नामुळे महायुतीला राज्यात पराभव पत्करावा लागल्याचे आता त्यांच्याच घटक पक्षाच्या नेते सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना कांद्याने रडवले आहे. त्यांना कांद्याने वांदा केल्याचे मान्य केले. तरीदेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार पावलं टाकताना दिसत नाही. नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी महिनाभरात संयुक्तपणे पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले असले होते. मात्र दिड महिन्यात फक्त २५ हजार टन कांदा खरेदी केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना कांदा रडवणार हे मात्र नक्की असे देखील पवार म्हणालेत.

तसेच कांदा प्रश्न आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेवरून उद्धव ठाकरे यांनी देखील भाजप आणि राज्यातील महायुतीवर निशाना साधला. शरद पवार यांनी कांद्यावरून जसे उत्तर दिले तसेच ठाकरे यांनी दिले. ठाकरे म्हणाले, राज्यातील कांदा प्रश्न आणि कांदा उत्पादकांनी भाजपला रडवलंच. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे होते त्यांना देखील कांद्याने रडवले असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT