Sharad Pawar : "फक्त २ दिवस थांबा, सगळं सरळ करू!"; दुष्काळ प्रश्नावरून शरद पवार यांचा सरकारला इशारा

Purandar drought conditions : यंदा पुरंदर तालुक्यासह राज्यात सर्वदूर दुष्काळस्थिती निर्माण झाली. सरकारने उपाय योजना न केल्याने भीषण पाणी टंचाई अद्याप दूर झालेली नाही.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : पुरंदर तालुक्यासह राज्याच्या विविध भागात यंदा दुष्काळस्थिती निर्माण झाली. राज्याच्या विविध भागात अद्यापही पाणी टंचाई असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान खासदार शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारपासून (ता.११) दौरा सुरू केला. पवार यांनी बुधवारी (ता.१२) पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील वाल्हे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी, आमची सर्वांची इच्छा फक्त इतकीच आहे की स्थानिकांना पाणी मिळायला हवे. येथील तरूणांच्या हाताला काम मिळायला हवे, असे म्हटले आहे.

वाल्हे येथे पवार यांच्यासमोर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने आपल्या समस्या मांडल्या. त्यावेळी दुष्काळ आणि मदतीवरून सरकारवर निशाना साधताना पवार यांनी शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. तर फक्त ‌दोन दिवस थांबा, सगळं सरळ करू असे आश्वासन दिले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : '...अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल!'; शरद पवार यांचा सरकारला इशारा

यंदाच्या दुष्काळाच्या मानाने सध्या पडत असलेला पाऊस अपूरा असून याने दुष्काळाचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे येथील लोकांसाठी गरजेची असणारी गुंजवणी पाणीपुरवठा योजना पुर्ण लवकर पुर्णत्वास जावी. त्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा अशी मागणी पवारांनी केली आहे.

गुंजवणी पाणीपुरवठा योजनेवरून सरकारवर जोरदार निशाना साधताना, या प्रकल्पाची सुरुवात माझ्या सहीने झाली. मात्र अद्याप कालव्याचे काम झाले नाही. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्यासोबत आपण स्वत: बैठकीला बसू. तर मुख्यमंत्री म्हणतील तिथे यासाठी जायला तयार असल्याचेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा, पाणीसाठ्यावर व्यक्त केली चिंता

मोदींच्या डोक्यात हवा गेली

पवारांनी मोदी यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीका करताना, मोदी यांच्या डोक्यात हवा गेली असून त्यांचे पाय जमिनीवर राहिलेले नाहीत. मोदींच्या मनात समाजातील काही घटकांबद्दल आकस असून मोदींनी त्यांच्या भाषणातून समाजात दुही निर्माण केली असा आरोप पवार यांनी केला.

देशातील जनतेनं योग्य निकाल दिला

आपण गेली ५६ वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. या दरम्यान अनेक पंतप्रधान पाहिले. काहींसोबत कामही केलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांनी देशाचे हित पाहीले. मात्र भाजपने सध्याची परिस्थिती वेगळी निर्माण केली. म्हणूनच देशातील जनतेनं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन निकाल दिला. त्यामुळेच भाजपला चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांची मदत घ्यावी लागली. मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांना घेऊन सरकार स्थापन करावे लागत असल्याचे पवार म्हणाले. तर आपल्यासह काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांनी लोकांसाठी एकत्र काम करण्याचे ठरवल्याचेही पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com