Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात

Sharad Pawar Latest News : ‘‘पुण्यात एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, की राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात.

Team Agrowon

Pune News : ‘‘राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. मात्र ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही. पुण्याचा नागरिक शहाणा आणि समंजस आहे. तो सत्ताधाऱ्यांच्या प्रवृत्तीला योग्यवेळी योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

राज्यात आणि देशात अत्यंत चिंताजनक स्थिती आहे,’’ अशी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी (ता. ११) पत्रकार परिषदेमध्ये केली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘पुण्यात एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, की राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. आता सत्ता हातात आहे, पोलिस दल हातात आहे, त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. हल्ला केलेल्या कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी गंभीरपणे दखल घ्यायला हवी होती, पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे.’’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना श्री. पवार म्हणाले,‘‘ मी पहिली निवडणूक बैलजोडीवर लढलो, नंतर आमचे चिन्ह गेले. आम्ही चरख्यावर लढलो, नंतर आम्ही हाताच्या पंजावर लढलो. ते गेल्यावर आम्ही घड्याळावर लढलो. चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असते.

पण निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आमचे पक्षचिन्ह काढून घेतले नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱ्याच्या हातात दिला हे देशात घडले नव्हते. मतदार या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल.’’

‘मला भावनिक बोलायची गरज नाही’

अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘मी निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे मला भावनिक बोलायची गरज नाही. बारामतीचे लोक हुशार आहेत. त्यांची प्रतिष्ठा कुणी वाढविली आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.’’

‘शिवाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर इतिहास घडविला’

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे राजमाता जिजाऊ यांचा हात आहे. व्यक्तिमत्त्व घडवणे, दिशा देणे हे काम राजमाता जिजाऊ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वत:चे कर्तृत्व, स्वत:चे कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडलेला आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT