Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ, हीच मोदींची गॅरंटी ; शरद पवारांचा पंतप्रधनांवर हल्लाबोल

Sharad Pawar Latest News : माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Mahesh Gaikwad

Pune News : केंद्रात सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले का? एकच गोष्ट वाढली ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, ''आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्यामध्ये ते मोदींची गॅरंटी देत आहेत. पण ही जाहिरात कोणाच्या पैशाने देत आहेत. देशातील जनतेच्या पैशाने या जाहिराती दिल्या जात आहेत, आणि मोदी देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाले आहेत.

आज हे सांगतायत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढल का? एकच गोष्ट वाढली ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली,'' अशा शब्दात पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

अमित शाहांना प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना पवार यांच्यावर टीक केली होती. मुंबईतील भाषणात शाहा यांनी म्हटले की, पन्नास वर्षे शरद पवार महाराष्ट्रावर बसले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, पन्नास वर्षे लोकांनी मला निवडून दिले, त्यांनी मान्य केले.

लोणावळा शहर हे गांधी आणि नेहरूंच्या विचाराने वाढले. रामभाऊ महाळगी सुद्धा इथे यायचे. काँग्रेस आणि जनसंघ शक्तिशाली असणारे असे हे एकमेव शहर होते, असेही पवार यावेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT