Sharad Pawar : केंद्र सरकारची कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका नाही : शरद पवार

Delhi Farmers Protest : केंद्र सरकार विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जोरदार आंदोलन सुरू आहे.
Sharad Pawar
Sharad Pawaragrowon

Central Government : केंद्र सरकार विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जोरदार आंदोलन करत आहेत. एक आठवड्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी आणखी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान यावर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत केंद्राच्या शेती विषयक धोरणांवर जोरदार टीका केली.

यावेळी पवार म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून हमीभावासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना सरकार अमानूष वागणूक देत आहे. दिल्लीचे शेतकरी हमीभावाच्या मागणीसाठी सरकार प्रयत्नशील नसल्याचेही पवार म्हणाले.

या सरकारची कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका नाही तसेच देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात बंदी केली असल्याचे सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात निर्यात बंदी झालीच नसल्याचे पवार म्हणाले.

शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी

याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीच्या चर्चेत लोकसभेच्या ३९ जागांवर एकमत झाले असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत गेले दोन महिने जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्यावतीने मैदानात उतरण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे शाहू महाराज हे काँग्रेसच्याकडूव लढणार की राष्ट्रवादीकडून याबाबत अद्याप संभ्रम आहे.

Sharad Pawar
Kolhapur Flood Survey : महापुरात सर्वाधिक बाधित होणाऱ्या तालुक्यालाच वगळलं, जागतिक बँकेने काय पाहणी केली?

आणखी एक पवार राजकारणात

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात अॅक्टिव्ह होत असल्यावरुन शरद पवारांना विचारण्यात आलं. "आधी ते राजकारणात होते हेच मला माहिती नाही. ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. अजितदादांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. ते अमेरिकेतून शिकून आलेले आहेत" अशी माहिती पवारांनी दिली. नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अजितदादांचा सख्खा पुतण्या शरद पवारांच्या गटात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com