Jowar Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शिरोळमध्ये तांबेऱ्यामुळे शाळू पीक धोक्यात

Jowar Crop : दाट धुक्यामुळे शाळू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार असून, वर्षभराच्या धान्याची बेगमी आणि पावसाळ्यात जनावरांना लागणाऱ्या‍ सुक्‍या चाऱ्याच्या नियोजनाचे शेतकऱ्यांचे गणित यामुळे बिघडणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : दाट धुक्यामुळे शाळू पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार असून, वर्षभराच्या धान्याची बेगमी आणि पावसाळ्यात जनावरांना लागणाऱ्या‍ सुक्‍या चाऱ्याच्या नियोजनाचे शेतकऱ्यांचे गणित यामुळे बिघडणार आहे.

अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईतही पिकांना जीवदान दिले असून, आता तांबेऱ्याचा प्रादुर्भावामुळे चिंता निर्माण झाली आहे. ऊस तोडीनंतर शेतकऱ्यांनी जानेवारीत शाळूची लागवड केली. या परिसरात प्राधान्याने मालदांडी या जातीचा शाळू पिकविला जातो. सध्या दोन महिन्यांचे हे पीक सुमारे अडीच फुटांवर आहे. पीक हिरवे असतानाच त्यावर आता तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर धुके पसरले होते. यामुळेच तांबेऱ्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप धुक्याचे प्रमाण जाणवत आहे. शाळू पिकाच्या पानांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत असल्याने पानगळीचे प्रमाणही वाढले आहे. पाने लालसर, पिवळी पडत आहेत. शाळू पीक हातचे जाणार की काय, अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

पावसाळ्यात जनावरांना सुका चारा म्हणून शाळू पिकाचा कडबा शेतकरी साठवून ठेवतात. मात्र, रोगामुळे धान्य ही नाही आणि चाऱ्याचीही उपलब्धता नाही, अशी स्थिती निर्माण होणार आहे.

अडीच ते तीन फुटांवर पिकांची वाढ झाल्याने फवारणी करणेही अडचणीचे बनले आहे. हिवाळ्याला प्रारंभ झाल्यापासूनच शेतीच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी निर्माण झाला होता. आणखी पंधरा ते वीस दिवसांनंतर पोटरीची प्रक्रिया सुरू होणार असतानाच तांबेरा रोगामुळे शाळू पीक कोमेजत आहे. त्यामुळे सध्या ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT