Crop Insurance Application: पावसाअभावी खरीप हंगाम आधीच संकटात सापडला असताना आता पीकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) चालक पीकविमा अर्ज भरून देण्यासाठी प्रति अर्ज १०० रुपये नियमबाह्य शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. .त्यामुळे योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सध्या सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी आदी खरीप पिकांसाठी विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत हळदीसह विविध पिकांसाठीही विमा अर्ज स्वीकारले जात आहेत..CSC locks: सहाशे ‘सीएससी’ केंद्रे तात्पुरती बंद.विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने सीएससी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील सीएससी चालक प्रत्येक अर्जासाठी १०० रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, विमा कंपनीकडूनही सीएससी चालकांना अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज ४२ रुपये सेवा शुल्क मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून स्वतंत्र शुल्क आकारणे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे..Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा.पावसाअभावी पेरणीनंतरची पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही भविष्यातील नुकसानभरपाईच्या आशेने पीकविमा काढत आहेत. अशा परिस्थितीत नियमबाह्य शुल्क भरावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही ठिकाणी पावती न देता रोख रक्कम घेतली जात असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांनी या प्रकाराची दखल घ्यावी..जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे सीएससी केंद्रांची तपासणी करावी, नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करावी आणि वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, प्रशासनाने अधिकृत सेवा शुल्काबाबत स्पष्ट सूचना प्रसिद्ध करून सर्व सीएससी केंद्रांवर शुल्काचा फलक लावणे बंधनकारक करावे. तसेच तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी, अशीही मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.