Sorghum Crop Crisis : शाळूबरोबर जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या भेडसावणार, तांबेरा रोगाचा पिकांवर गंभीर परिणाम

Tambera Disease : रबी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या शाळूवर देखील कमी पाऊस आणि वातावरणाचा परिणाम झाला आहे.
Sorghum Crop Crisis
Sorghum Crop Crisisagrowon

Tambera Disease Sorghum Crop : यंदा कमी पावसाने अनेक पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. रबी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या शाळूवर देखील कमी पाऊस आणि वातावरणाचा परिणाम झाला आहे. रबी हंगामाच्या सुरूवातीला पुरेसा पाऊस न झाल्याने रबी पिकांना मोठा फटका बसला तसेच शाळू सारख्या पिकांवर हुरडा भरत असताना धुक्याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू पिकावर तांबेरा सारख्या रोगाचा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

दाट धुक्यामुळे शाळू पिकावर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार असून, यामुळे वर्षभराच्या धान्याची बेगमी आणि पावसाळ्यात जनावरांना लागणाऱ्या सुक्या चाऱ्याच्या नियोजनाचे शेतकऱ्यांचे गणित बिघडणार आहे.अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईतही पिकांना जीवदान दिले असून, आता तांबेऱ्याचा प्रादूर्भावामुळे चिंता निर्माण झाली आहे.

ऊस तोडीनंतर शेतकऱ्यांनी जानेवारीत शाळूची लागवड केली. या परिसरात प्राधान्याने मालदांडी या जातीचा शाळू पिकविला जातो. सध्या दोन महिन्यांचे हे पीक सुमारे अडीच फुटांवर आहे. पीक हिरवेगार असतानाच त्यावर आता तांबेऱ्याचा प्रादूर्भाव जाणवत आहे. फेब्रुवारीच्या १५ तारखेच्या आसपास मोठ्या प्रमाणावर धुके पसरले होते. यामुळेच तांबेऱ्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

अद्यापही धुक्याचे प्रमाण जाणवत आहे. शाळू पिकाच्या पानांवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव होत असल्याने पानगळीचे प्रमाणही वाढले आहे. पाने लालसर, पिवळी पडत आहेत. यामुळे शाळू पीक हातचे जाणार की काय, अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

पावसाळ्यात जनावरांना सुका चारा म्हणून शाळू पिकाचा कडबा शेतकरी साठवून ठेवतात. मात्र, रोगामुळे धान्य ही नाही आणि चाऱ्याचीही उपलब्धता नाही,अशी स्थिती निर्माण होणार आहे. अडीच ते तीन फुटांवर पिकांची वाढ झाल्याने फवारणी करणेही अडचणीचे बनले आहे.

Sorghum Crop Crisis
Tigers in kolhapur forest : कोल्हापूरच्या जंगलात लवकरच दिसणार आता चंद्रपूरचे वाघ!

हिवाळ्याला प्रारंभ झाल्यापासूनच शेतीच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी निर्माण झाला होता. आणखी पंधरा ते वीस दिवसांनंतर पोटरीची प्रक्रिया सुरू होणार असतानाच तांबेरा रोगामुळे शाळू पीक कोमेजत आहे. वर्षभराच्या धान्याची बेगमी आणि पावसाळ्यात जनावरांना सुका चार म्हणून ज्वारी पिकाची लागवड केली आहे. यावर्षी मात्र धुक्याचा परिणाम म्हणून तांबेऱ्याचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

वाऱ्याने पसरतोय प्रादूर्भाव

वाऱ्याच्या वेगाने शाळूसह इतर पिकांवरदेखील तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला मोजक्या क्षेत्रातील पिकांवर तांब्याचा प्रादूर्भाव जाणवत होता. दिवसेंदिवस वाढत्या धुक्यामुळे हा प्रादूर्भाव वाढत आहे.

फवारणीवर खर्च करावा की धान्य विकत घ्यावे

बियाणे, मजुरी, पाणी, औषधे, खते यांवर एकरी सुमारे पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांनी खर्च केले आहेत. आता पुन्हा फवारणी करावी तरी पीक हाताला लागेल याची शाश्वती नसल्याने फवारणी करावी की धान्य विकत घ्यावे, अशी द्विधा स्थिती शेतकऱ्यांची बनली आहे.

अर्धा एकर शेतीत जानेवारीमध्ये शाळू लागवड केली. पीक सध्या अडीच फुटांवर असून आणखी तीन आठवड्यांत पोटरीच्या प्रक्रियेत आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या धुक्यामुळे पिकावर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव झाल्याने पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. - संदीप खामकर, शाळू उत्पादक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com