Advanced Technology in Dairy: दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचविणारे विस्तार शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी व्यक्त केले..ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, पशुसंवर्धन विभाग आणि एमएसडी पशू आरोग्य यांच्या वतीने ‘भविष्योन्मुख पशुवैद्यकीय सेवा : उदयोन्मुख तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती आणि शाश्वत पशुधन आरोग्य’ या विषयावर सोमवारी (ता. १३) पशुवैद्यकांसाठी आयोजित विभागीय तांत्रिक चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते..Ai in Dairy Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेतून दुग्ध व्यवसायात परिवर्तन.लातूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बिडवई, ‘वनामकृवि’चे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ज्येष्ठ पशुवैद्यक शास्त्रज्ञ तथा माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, एमएसडीचे राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी तथा पशुप्रजनन तज्ज्ञ डॉ. उमेश कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, डॉ. सखाराम खुणे, डॉ. आर. डी. कदम, कार्याध्यक्ष डॉ. अरविंद देशपांडे आणि सचिव डॉ. रवींद्र डावरे यांची प्रमुख उपस्थिती होती..डॉ. पडिले यांनी चर्चासत्रामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. बिडवई यांनी ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला, तर डॉ. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. भिकाने यांनी प्रतिजैविक प्रतिरोधकता ही पशुवैद्यकीय आणि मानवी आरोग्यासमोरील अत्यंत गंभीर जागतिक समस्या असल्याचे सांगितले. जिवाणूजन्य आजारांवरील उपचार टाळणे हा त्यावरील उपाय नसून, प्रतिजैविकांचा जबाबदारीने, वैज्ञानिक पद्धतीने, अचूक निदानाच्या आधारे आणि केवळ आवश्यकतेनुसार वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..AI In Dairy Farming: पशुसंवर्धनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर.‘‘उपचारप्रधान पशुवैद्यकीय सेवेकडून प्रतिबंधात्मक आणि पूर्वानुमानाधारित पशुवैद्यकीय सेवेकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील पशुवैद्यक हा केवळ उपचार करणारा चिकित्सक न राहता कळप आरोग्य तज्ज्ञ, रोगसाथशास्त्रज्ञ, अन्नसुरक्षा तज्ज्ञ आणि ‘वन हेल्थ’ तत्त्वज्ञानाचा प्रभावी समन्वयक म्हणून बहुआयामी भूमिका पार पाडेल,’’ असेही डॉ. भिकाने म्हणाले..डॉ. कुंभार यांनी दुग्ध उत्पादन वाढीसाठी गाई-म्हशींची प्रजननक्षमता वाढविण्याचे महत्त्व विशद केले. वंध्यत्वावरील उपचारांमध्ये संप्रेरकांचा वापर हा अंतिम पर्याय असावा. त्याआधी जनावरांना संतुलित आणि पोषक आहार देणे, तसेच गर्भाशयातील संसर्गावर योग्य उपचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहायक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, एमएसडी पशू आरोग्यचे प्रक्षेत्र व्यवस्थापक कुणाल घुंगार्डे, उपायुक्त डॉ. दीपक मुळे, डॉ. शिवाजी बुचाले, डॉ. अतुल टापर, डॉ. भास्कर बोरगावकर, राजेंद्र क्षीरसागर, डॉ. राजशेखर दडके, डॉ. एस. एम. नेरळकर यांच्यासह लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने पशुवैद्यक उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.