Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : साहेब पिढीजात टिकवलेली जमीन वाचवा, पालकमंत्री मुश्रीफांना शेतकऱ्यांचे निवेदन

Guardian Minister Hasan Mushrif : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा सर्व्हे रद्द करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, या मागणीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा सर्व्हे करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रूतगती महामार्ग प्रस्तावित आहे. हा महामार्ग शेतजमिनीतून जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्यांवर हा महामार्ग झाल्यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. पिढीजात टिकवून ठेवलेली शेतजमीन नाहीशी होणार आहे. जर शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरातुन पुणे-बंगळूर महामार्गमार्गे निपाणी-देवगड महामार्गावरून गोव्याला जोडला तर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीसह शासनाचेही कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.

शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्गाचा अवलंब करून शेतजमिनीतून सुरू असलेला सर्व्हे तत्काळ थांबवावा व पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, यासाठी येत्या १८ जूनपूर्वी निर्णय करावा, अन्यथा १८ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल.

यावेळी कॉ. शिवाजी मगदूम, दादा पाटील, आनंदा पाटील, योगेश कुळवमोडे, संतोष लोंढे, सुरेश संकपाळ, संभाजी पाटील, दिनकर लोंढे, युवराज कोईगडे, युवराज पाटील, संग्राम वडिंगेकर, सागर पाटील, बी. जी. पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, नेताजी मोरे, सुरेश बोभाटे यांच्यासह शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT