Kolhapur Market Update : कोथींबीर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस, लिंबू दर उतरले

Vegetable Prices : कोबी, फ्लॉवरची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. अन्य भाजीपाल्यांची आवक कमी असली तरी मागणी नसल्याने दर टिकून आहेत.
Kolhapur Market Update
Kolhapur Market Updateagrowon
Published on
Updated on

Market Rate : सध्या आठवडा बाजारात पालेभाज्यांचा पुरवठा कमी असल्याने कोथिंबिरीच्या दराने पन्नाशी गाठली आहे. तर पालेभाज्यांच्या दराची तेजीही कायम आहे. दरम्यान आगामी काळात पाऊस झाल्यास भाजीपाल्यांचे दर कमी येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाजार समितीत कांद्याची आवक या आठवड्यात कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर प्रतिकिलो ५ ते ८ रुपयांनी वाढले आहेत.

तसेच कोबी, फ्लॉवरची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. अन्य भाजीपाल्यांची आवक कमी असली तरी मागणी नसल्याने दर टिकून आहेत. लिंबूची मागणी घटल्याने दरात मोठी घट होत प्रति शेकडा २०० ते ३०० रुपयांनी दर उतरले आहेत. फूल बाजारात झेंडूची जुनी आवक अंतिम टप्प्यात असून नवीन आवक सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

त्यामुळे झेंडूचे दर प्रति किलो ५० रुपयांनी वाढले आहेत. आंबा सोडून फळ बाजारात नवीन आवक नाही. खाद्यतेलाच्या दरात चढउतार सुरूच आहे. धान्य बाजारात हरभरा आणि हरभरा डाळीचे दर वाढले आहेत. प्रतिकिलो ५ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच तांदळाचे दरही वाढत आहेत.

प्रति किलो रुपये भाज्यांचे दर टोमॅटो- २० ते ३०, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची - ८० ते ९०, फ्लॉवर - ४० ते ५०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा ३० ते ३५, लसूण- २०० ते २४०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ५०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २०० ते २२०, गवार-८० ते १००, भेंडी-४० ते ५०, काकडी- ५० ते ६०, दुधी २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २० ते २५, कोथिंबीर - ५० ते ६०, मेथी - ३० ते ३५, शेवगा - २ ते ३ रुपये नग.

फुले : झेंडू - १२० ते १५०, निशिगंध - १०० ते १२०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा १०० ते १२०, शेवंती - १८० ते २००.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

Kolhapur Market Update
Bedana Market : बेदाण्याला मिळतोय चांगला भाव ; यंदाचा बेदाणा हंगाम गोड

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ८५ ते ८८, तूरडाळ- १७० ते १८०, मूगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ- १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसूर- ७० ते ९०, फुटाणाडाळ ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१४० ते १६०.

माशांची आवक ठप्प

माशांची आवक ठप्प मासे बाजारात माशांच्या आवकेला ब्रेक लागला आहे. नदीतील मासेमारी थांबल्याने आवक थांबली आहे. बाजारात नदीतील माशांची आवक झालीच तर ती कर्नाटक भागातून होत आहे. दुसरीकडे समुद्री माशांची नियमित आवकही पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे दर किलोला २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. कोल्ड रुम माशांची आवक सध्या सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com