Kolhapur Loksabha Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Result 2024 : कोल्‍हापुरात शाहू महाराज; हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी

Kolhapur Loksabha Assembly : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी १ लाख २३ हजार मतांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव केला.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी १ लाख २३ हजार मतांनी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव केला. अखेरच्या फेरीपर्यंत चुरशीने झालेल्‍या हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी १४,७५१मतांनी विजय संपादन केला.

पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगलेची लढत थरारक झाली. श्री माने यांनी विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या महाविकास आघाडीचे सत्‍यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ॅयांना उमेदवारी देत महायुतीपुढे आव्हान निर्माण केले होते.

त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विजयाच्या चर्चा होत होत्‍या. अखेर त्यांनी एकतर्फी बाजी मारत श्री मंडलिक यांचा पराभव केला. हातकणंगलेचे उमेदवार स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांचीही उमेदवारी तुल्‍यबळ होती. परंतु अनपेक्षितपणे श्री. शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर गेले. खरी लढत श्री माने व श्री सरुडकर यांच्यात झाली. यात श्री माने यांनी संघर्षपूर्ण लढतीत बाजी मारली.

पंधराव्‍या फेरीपर्यंत श्री सरुडकर हे चार ते पाच हजार मतांनी आघाडीवर होते. पण अखेरच्या दहा फेऱ्यांमध्ये त्यांची आघाडी मोडून काढत श्री माने यांनी विजय मिळवला. शेतकऱ्यांचे श्री शेट्टी यांच्या पराभवाने शेतकरी चळवळीला धक्का बसला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राजू शेट्टी यांची मोठी हवा होती. त्यांना शिवसेना ठाकरे गटाने मशाल चिन्हावर लढण्याची विनंती केली. परंतु चिन्हावर लढणार नाही असे सांगत त्यांनी ऑफर धुडकावली होती.

पंधराव्या फेरीअखेर उमेदवार पक्ष मिळालेली मते

हातकणंगले

धैर्यशील माने महायुती ४,३६,९५३

सत्यजीत पाटील महाविकास आघाडी ४,२३,४३५

राजू शेट्टी स्वाभिमानी संघटना २८६१४३

कोल्हापूर

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज महाविकास ५,५०,७३७

प्रा. संजय मंडलिक महायुती ४,७३,००६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT