Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरात मान गादीला अन् मतही गादीला, हातकणंगलेत काटे की टक्कर

Raju Shetti : हातकणंगले लोकसभा मतदार संघात तिरंगी लढतीत शेतकरी नेते राजू शेट्टी हे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले आहेत.
Kolhapur Lok Sabha Election
Kolhapur Lok Sabha Electionagrowon

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती हे दुपारी १ वाजेपर्यंत मोजलेल्या आठव्या फेरीअखेर ६५ हजार २१९ मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापुरात प्रचारादरम्यान मान गादीला मत मोदीला अशा घोषवाक्यावर महायुतीकडून प्रचार सुरू होता दरम्यान यावर उत्तरादाखल महाविकास आघाडीकडून मान गादीला मतही गादीला असा प्रचाराचा ट्रेंड सुरू केला हाच फॅक्टर काँग्रेसने चालवत जोरदार प्रचार केला. दरम्यान याला यश येताना दिसत आहे.

शाहू छत्रपती यांनी विजयाच्या दिशेने आघाडी घेतली आहे. शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर असल्याने शाहू महाराज यांना मिळालेले लीड आता तुटणे अशक्य होत चालले आहे. शाहू छत्रपती यांच्या आघाडीने कोल्हापूर शहरात जल्लोष नवीन राजवाड्यासह शहरभर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

Kolhapur Lok Sabha Election
Kolhapur Farmers : हुमणी किडीने शेतकरी बेजार, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

पाचव्या फेरीअखेर एकूण ३ लाख ९२ हजार ८११ मते मोजली आहेत. त्यातील शाहू छत्रपती २ लाख १४ हजार ०७० तर मंडलिक यांना १ लाख ७७ हजार ४९९ मते मिळाली आहेत. या मतदार संघात रिंगणात २३ उमेदवार असले तरी थेट दुरंगीच लढत झाली आहे. सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये शाहू छत्रपती यांना कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्क्य मिळत आहे. मंडलिक यांना कागल, चंदगड आणि कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून मताधिक्क्य मिळत आहे परंतू ते फार कमी आहे.

हातकणंगलेत काटे की टक्कर

हातकणंगले लोकसभा मतदार संघात तिरंगी लढतीत शेतकरी नेते राजू शेट्टी हे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले आहेत. तर विद्यमान खासदार धैर्यशिल माने आणि महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील सरूडकर यांच्यामध्ये काटे की टक्कर होताना दिसत आहे. १ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार २ लाख १० हजार ४७४ मते मिळाली आहेत तर ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील सरूडकर यांना 2 लाख ९ हजार ३७४ मते मिळाली आहेत. माने आणि सरूडकर यांच्यामध्ये फक्त १हजार १०० मतांनी माने यांनी आघाडी घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com