Radhakrishna Vikhe Patil : ''निवडणूक आयोग परवानगी देईल असं वाटतं नाही. त्यामुळे..."; महसूल मंत्री विखे पाटील यांची माहिती

Ahmednagar Drought Conditions : अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon

Pune News : राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथील करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. यामुळे राज्य सरकारने हातावर हात ठेवले आहे. यादरम्यान ही मागणीच मान्य होईल असे दिसत नसल्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी रविवारी (ता.२) म्हटले आहे. यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या मोठ्या प्रश्नावर तोडगा सध्या तरी निघणे शक्य नसल्याचेच समोर आले आहे.

विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी आणि चाऱ्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे बैठका घेण्यासाठी आम्ही परवानगी मागितली होती. मात्र ती ४ जूनपर्यंत मिळेल असे दिसत नाही. त्यामुळे ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच जिल्ह्यासह राज्याच्या दुष्काळाबाबत निर्णय होईल.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : शेती-शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मैतर

तसेच जिल्ह्यातसह राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थिती आणि चाऱ्याच्या संदर्भात पशुसंवर्धन खात्याकडून उपायोजना करण्यात आल्या आहेत. तर पाणी पातळीवर घटत चालली असली, तरी सर्व उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आपण स्वतः आढावा घेणार असल्याचेही विखे यांनी म्हटल आहे.

कुकडीचे आवर्तन

तसेच माणिकडोहातून पाणी घेण्याचा कळीचा मुद्दा होता. त्यावर मतमतांर होते. तोही आता सुटला असून पाणी आले आहे. तर कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय कलवा सल्लागार समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. पण आता यात श्रेयवादाची लढाई सुरू होईल. आम्हाला ती नको आहे. आमचे महायुतीचे सरकार अतिशय संवेदनशील आहे. कोणताही निर्णय करताना जनतेचा हिताचाच आम्ही करतोय. श्रेय घेण्यासाठी असे राजकारण होतच असते. याला कर्जत-जामखेड त्याला अपवाद नाही असेही विखे यांनी म्हटल आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : स्वच्छता मोहीम ही लोकचळवळ व्हावी : विखे

नगरमधील तीन धरणांची स्थिती

अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात यंदा दुष्काळ परिस्थिती आहे. नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात अनुक्रमे ६.९५, ८.१२ आणि ६.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभार बनली आहे. शेतकरी शेताला पाणी नसल्याने हवालदिल झाला असून पशूधनासाठी देखील चारा-पाणी मिळवणे कठीण झाले आहे.

अहमदनगरला ३३८ टँकरचा आधार

अहमदनगर जिल्ह्यातील ३३५ गावे आणि १७८७ वाड्यावस्त्या यंदा दुष्काळाच्या छायेत आली आहेत. येथे ३३८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर राज्यातील ३१३० गावे आणि ७९७९ वाड्यावस्त्यांमध्ये ३८१६ टँकरने प्रशासन आधार देत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com