Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खानापूर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली

Water Crisis : खानापूर तालुक्यात जलसाठे संपुष्टात येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने वाढू लागली आहे.

Team Agrowon

Sangli News : खानापूर तालुक्यात जलसाठे संपुष्टात येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने वाढू लागली आहे. तालुक्यातील ऐनवाडी, घोटी खुर्द, रेवणगाव, घाडगेवाडी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी खानापूर पंचायत समिती प्रशासनाने चार गावांत विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. याचे पाणी सार्वजनिक विहिरीत सोडून ग्रामस्थांना पुरविले जात आहे. खानापूर तालुक्यात या वर्षी कमी पर्जन्यमान झाले आहे. विहिरी, तलावातील सध्या उपलब्ध असलेले जलसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत.

तलावाखाली असणाऱ्या सार्वजनिक विहिरीतील पातळी खालावू लागल्याने पिण्याच्या पाण्यावर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ऐनवाडी, घोटी खुर्द, रेवणगाव, घाडगेवाडी गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी तहसीलदारांना मागणी पत्र दिले होते.

त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाने ऐनवाडी, घोटी खुर्द व घाडगेवाडी येथे प्रत्येकी एक व रेवणगाव येथे दोन विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. विंधन विहिरींद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

वरील चार गावांसह अन्य गावांतही पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्यांची टंचाई सुरू आहे. जनावरांसाठी पशुपालक वैरण विकत घेऊन जनावरे जगवू लागल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT