Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought : ‘नगर, नाशिकमध्येही गंभीर दुष्काळ; आदेश चुकीचा’

Jayakwadi Water Shortage : जायकवाडी लाभक्षेत्रात पाण्याची कमतरता आहे का? हे काहीच पाहिले जात नाही. पाण्याची कमतरता तयार होणार नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पाणी सोडता येणार नाही,’’ अशी भूमिका कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी मांडली.

Team Agrowon

Nagar News : ‘नगर, नाशिक जिल्ह्यात खरिपात पिकांचे नुकसान झाले. रब्बीची पिके येतील की नाही याची शाश्वती नाही. याउलट जायकवाडी लाभक्षेत्रात स्थिती आहे. जायकवाडीत पुरेसे पाणी आहे. मृतसाठाही मोठा आहे. तरीही पाणी सोडण्याचा घाट घातला जात आहे. लाभक्षेत्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे का?

पाण्याची कमतरता आहे का? हे काहीच पाहिले जात नाही.पाण्याची कमतरता तयार होणार नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पाणी सोडता येणार नाही,’’ अशी भूमिका कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी मांडली.

काळे म्हणाले,‘‘कुठलीही बाब न पाळता पाणी सोडण्याचा निर्णय करून उच्च न्यायालयाच्या २३ सप्टेंबर २०१६ च्या निकालाचा एकप्रकारे अवमान केला आहे. नगर, नाशिक भागातून पाणी सोडू नये म्हणून आंदोलने होत आहेत.’’

मराठवाड्यातून सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी समन्यायी पाणी वाटपाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेच्या सुनावणीत मराठवाड्याची बाजू मांडण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (मसिआ) व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. त्यावर आज (ता. २१) सुनावणी होईल.

नगर, नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जायकवाडीत पुरेसे पाणी आहे. तरीही पाणी सोडण्याचा घाट का घातला जात आहे. या विरोधात न्यायालयात गेलो आहोत. जायकवाडीतील पाण्याचा विचार करता पाणी टंचाई, पाणी कमतरता नाही.
आशुतोष काळे, आमदार, कोपरगाव (जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे

Sugarcane Farming : ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे

Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला

Dairy Farming : दुग्ध व प्रक्रिया व्यवसायातून शोधला आनंद

SCROLL FOR NEXT