Jayakwadi Water Issue : पाणीप्रश्‍न सुटला नाही, पण आंदोलकांना उचलले

Marathwada Water Issue : साडेचार तासाच्या आंदोलनानंतर पाणी सोडण्याचे राहिले बाजूला पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना जबरदस्तीने उचलून ताब्यात घेतले. पाणीप्रश्‍न सुटणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला.
Water Issue Protest
Water Issue ProtestAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २०) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर जालना रस्त्यावर मराठवाडा पाणी जन-आंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला.

साडेचार तासाच्या आंदोलनानंतर पाणी सोडण्याचे राहिले बाजूला पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना जबरदस्तीने उचलून ताब्यात घेतले. पाणीप्रश्‍न सुटणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला.

Water Issue Protest
Jayakwadi Water Issue : हक्काचे पाणी सोडा, अन्यथा पश्‍चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखू

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य जालना रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक जवळपास अडीच तास ठप्प झाली होती. ‘नाशिक नगर तुपाशी, मराठवाडा उपाशी’, ‘एकत्र आले सर्व पक्ष, हक्काचे पाणी एकच लक्ष’ यासह अनेक घोषणा आंदोलकांनी दिल्या. आमदार हरिभाऊ बागडे, आमदार राजेश टोपे, माजी मंत्री अनिल पटेल, अर्जुन खोतकर, आमदार संजय शिरसाट, राहुल पाटील, मराठवाडा पाणी परिषदेचे नरहरी शिवपुरे,

अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, कृष्णा पाटील-डोणगावकर, कॉ. राजन क्षीरसागर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाडुरंग तायडे, शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, शेतकरी संघटनेचे कैलास तवार आदींसह शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Water Issue Protest
Jayakwadi Water Issue : पाण्यासाठी नाशिक, नगर, मराठवाड्यातून जोर
वरच्या प्रकल्प समूहातील २३ मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्याचे बोलले जात होते. लहान ३५० व ३२०० स्थानिक प्रकल्पाचा तर हिशोबच नाही. न्यायालयाचा आदेश निघूनही पाणी सुटेना. सरकार नावाची व्यवस्था जिवंत आहे की नाही.
राजेश टोपे, आमदार.
हक्काचे आहे ते मिळालेच पाहिजे. दबाव कुणाचा आहे. तुमचा थेंब नको. अधिवेशन कशाला हवं, डोक्‍याच्या वर जाईल त्यावेळी मराठवाडा सहन करणार नाही.
संजय शिरसाट, आमदार
पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाणी सोडण्याची जबाबदारी आहे. आदेश देऊनही पाणी सोडले जात नाही. हा तर मराठवाड्याच्या पाणी हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे.
कॉ. राजन क्षीरसागर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com