Irrigation Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : सूक्ष्मसिंचन अनुदानाचे अनेक प्रस्ताव रखडले

Irrigation scheme : अनुदानाविना शेकडो प्रस्ताव रखडले असून, शासनाने यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात १० हजारांवर शेतकऱ्यांना १८२ कोटी रुपये सूक्ष्मसिंचन अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदानाविना शेकडो प्रस्ताव रखडले असून, शासनाने यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या अनुदानासाठी शेतकरी सतत अर्ज करीत आहेत. महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करतात. सध्या लॉटरी पद्धत असून, अनेक शेतकऱ्यांना या पद्धतीने पूर्वसंमती मिळण्यास विलंब होत आहे. पूर्वसंमतीसाठी दोन ते अडीच महिने प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून, हे धोरण चुकीचे असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

जेवढे अर्ज रोज ऑनलाइन सादर होतात, त्यांची पडताळणी करून आठवडाभरात पूर्वसंमती दिली जावी व लागलीच शेतात ठिबक संच बसविण्यासंबंधीची मुभा शेतकऱ्यांना दिली जावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांत आहे.

यातच दोन ते अडीच महिन्यांनंतर या योजनेची पूर्वसंमती मिळाल्यानंतर अनेकांनी पदरचा पैसा खर्च करून शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसविली आहे. परंतु संबंधित शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. संबंधित शेतकरी या अनुदानासाठी कृषी विभागात चकरा मारीत आहेत. परंतु अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

कारण हेक्टरी एक लाख रुपये किमान निधी सूक्ष्मसिंचन यंत्रणेसाठी लागतो. अनुदान उशिरा मिळत असल्याने ठिबक वितरक, पुरवठादार कमाल निधी शेतकऱ्यांकडून ठिबक देताना घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी एकूण आवश्यक निधीतील ८० ते ९० टक्के पैसे वितरकांना द्यावे लागले. यात अनुदान अनेक महिन्यांपासून अडकल्याने शेतकरी संभ्रमात व हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT