PM Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : ‘पीएम किसान’चा सतरावा हप्ता मोदींच्या हस्ते वितरित

17th Installment of PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता वितरित केला आहे.

Team Agrowon

Varanasi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. १८) येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता वितरित केला आहे. यातून सुमारे ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रशिक्षित कृषी सखी यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा ‘पीएम किसान’ योजनेच्या फायलीवर सही करून कामाला सुरुवात केली होती.

या अगोदर या योजनेचा १६ वा हप्ता २८ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये मिळतात. हे सहा हजार तीन टप्प्यांमध्ये मिळतात. डीबीटीअंतर्गत हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात येतो.

अशा प्रकारे तपासा खाते...

शेतकऱ्यांनी पहिल्यांदा https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन संबंधित लिंकवर क्लिक करून नोंदविलेला मोबाइल नंबर आणि आधार नंबर टाकून दिलेला कॅप्चा पूर्ण करून Get Status वर क्लिक केल्यास तिथे आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याचे तपासता येईल. तसेच पीएम किसान मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही शेतकरी आपल्या खात्याची स्थिती तपासू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT