PM Kisan Scheme : 'पीएम किसान'चा १७ वा हप्ता आज होणार जमा ; अशी करा इ-केवायसी

Mahesh Gaikwad

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या फाईलवर सही करून केली.

PM Kisan Scheme | Agrowon

पीएम किसान योजना

यानुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १७ वा हप्ता देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होणार आहे.

PM Kisan Scheme | Agrowon

पीएम किसान हप्ता

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये जमा केले जातात.

PM Kisan Scheme | Agrowon

इ-केवायसी

तुम्हीही योजनेचे लाभार्थी असाल आणि अजूनही तुमची इ-केवायसी पूर्ण झाली नसेल, तर १७ व्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये येणार नाही.

PM Kisan Scheme | Agrowon

इ-केवायसी प्रक्रिया

आज आम्ही तुम्हाला इ-केवायसी कशी करायची याची प्रक्रिया समजावून सांगणार आहोत. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत http://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा.

PM Kisan Scheme | Agrowon

आधार क्रमांक

येथे फार्मर कॉर्नर सेक्शनमध्ये इ-केवायसीच्या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचा आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक भरा.

PM Kisan Scheme | Agrowon

केवायी प्रक्रिया पूर्ण

त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल. ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर इ-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Kisan Scheme | Agrowon